शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

गुरुत्वाकर्षण न्यूटनने नाही तर भारतीयांनी शोधले : मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2019 13:05 IST

गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटनने लावल्याचे संपूर्ण जगाने मान्य केले आहे. मात्र न्यूटनच्या आधी हजारो वर्षांपूर्वी हिंदू धर्माच्या ग्रंथांमध्ये गुरुत्वाकर्षणाचा उल्लेख करण्यात आला आहे, असा दावा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल यांनी केला आहे.

पुणे : गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटनने लावल्याचे संपूर्ण जगाने मान्य केले आहे. मात्र न्यूटनच्या आधी हजारो वर्षांपूर्वी लिहिलेय  हिंदू धर्माच्या ग्रंथांमध्ये गुरुत्वाकर्षणाचा उल्लेख करण्यात आला आहे असा दावा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर संपूर्ण फिजिक्सचा पाया असणाऱ्या ऍटम आणि मॉलिक्यूल ही संज्ञाही ऋषी प्रणव यांची असल्याचेही त्यांनी म्हटले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे आयोजित कार्यक्रमात ते दिल्लीत बोलत होते. या कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत आणि योगगुरू बाबा रामदेवही हजर होते. 

यावेळी पोखरीयाल म्हणाले की, ' संस्कृत ही जगातील एकमेव वैज्ञानिक भाषा असल्याचे आपल्याला सिद्ध करायचे आहे. त्याकरिता त्यांनी आयआयटी आणि एनआयटीच्या कुलगुरू आणि प्राचार्यांना अभ्यास संशोधन करण्याची विनंती केली आहे. हे आपल्यासाठी आव्हान असून आपण ते नक्की पूर्ण करू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. संस्कृत ही प्रमाण भाषा असून लवकरच ती संगणकासाठी वापरली जाईल असे नासा या संस्थेने सांगितले आहे. त्यामुळे भविष्यात संगणक टिकणार असेल तर तो फक्त संस्कृतच्या आधारावर टिकेल असेही ते म्हणाले, अणूसारखी महत्वाची संकल्पना चरक ऋषींनी जगाला दिली. आपल्या परंपरा जर इतक्या उदात्त आहेत तर त्या जगाला का सांगायच्या नाहीत असा सवालही त्यांनी केला. 

टॅग्स :BJPभाजपाscienceविज्ञान