शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

वारसदाराची कृतज्ञता : सत्तेच्या गोंधळातही यशवंतराव चव्हाण पुण्यतिथीनिमित्त पवार कराडमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 10:39 IST

राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असताना शरद पवार आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त कराडमध्ये दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे शरद पवार सकाळीच कराडमध्ये हजर झाले असून त्यांनी यावेळी यशवंतराव चव्हाणांना आदरांजली वाहिली. 

मुंबई - पुतण्याचे बंड, आमदार फुटीचे संकट आणि शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस पक्षांना एकसंध ठेवणे असा तिहेरी पेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यासमोर निर्माण झाला आहे. मात्र राजकारणातील चाणक्य म्हणून ओळख असलेले पवार निवांत असून ते कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त कराडमध्ये दाखल झाले आहेत. 

राज्यातील आमदार फोडीसाठी भाजपकडून मोठे प्रयत्न करण्यात येत आहे. पुतणे अजित पवार भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्री झाले आहे. त्यांच्या सोबत गेलेले आमदार परत आणण्यात राष्ट्रवादीला यश आले आहे. अशा स्थितीत जे आमदार आहेत, त्यांना टिकविण्याचे आव्हाण राष्ट्रवादीसमोर आहे. याकामी शिवसेना आणि काँग्रेस देखील कामाला लागली आहे. मात्र महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्याची सर्वस्वी जबाबदारी शरद पवार यांच्यावर आहे. किंबहुना त्यांच्याशिवाय महाविकास आघाडीचे पानही हालत नाही. 

दरम्यान राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असताना शरद पवार आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त कराडमध्ये दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे शरद पवार सकाळीच कराडमध्ये हजर झाले असून त्यांनी यावेळी यशवंतराव चव्हाणांना आदरांजली वाहिली. 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद असो वा देशातील महत्त्वाची केंद्रीय मंत्रीपदे, चव्हाण साहेबांच्या कामगिरीतून त्यांचे जीवन व त्यांचे असामान्य कर्तुत्व ठसठशीतपणे अधोरेखीत झाले आहे. सामाजिक दृष्टिकोन, सुसंस्कृतपणा, संवेदनशीलता व साधेपणा या अंगभूत गुणांमुळे साहेबांच्या प्रतिमेला लाभलेली झळाळी आजही कायम आहे. आपल्या कर्तृत्वाने महाराष्ट्राला दिशादर्शक ठरलेल्या स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या उत्तुंग व्यक्तित्वाला त्यांच्या स्मृतीदिनी विनम्र अभिवादन, अशी पोस्टही पवारांनी शेअर केली आहे.