शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

द्राक्ष निर्यात येणार निम्म्यावर; परतीचा पाऊस, हवामानाचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 06:39 IST

राज्यभरात उत्पादन कमी; चांगला दर मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा

- संजय दुनबळे नाशिक : सातत्याने वातावरणात होणारे बदल, परतीचा पाऊस यामुळे निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने यावर्षी राज्यातून परदेशात होणारी द्राक्ष निर्यात निम्म्यावर येणार असली तरी निर्यातक्षम द्राक्षांना चांगला दर मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.राज्यातून दरवर्षी युरोप, रशिया, बांगलादेश आणि इतर देशात द्राक्षांची मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. राज्यातून होणाºया एकूण द्राक्ष निर्यातीत एकट्या नाशिक जिल्ह्याचा ९० टक्के वाटा आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, निफाड, सटाणा, कळवण आदी तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्यातक्षम द्राक्ष पिकविली जातात. यावर्षी बदलत्या हवामानाचा आणि परतीच्या पावसाचा द्राक्षांना चांगलाच फटका बसला असून, निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन निम्म्यावर आले आहे. हवामान सर्वसामान्य आणि द्राक्षाला पोषक असले तर एक एकर क्षेत्रातून शेतकऱ्याला साधारणत: १० ते १२ टन उत्पादन मिळत असते. यावर्षी हे प्रमाण खूपच कमी झाले असून, शेतकऱ्यांच्या हाती केवळ दोन ते तीन टन (निर्यातक्षम) माल लागत आहे. बहुतेक ठिकाणी कमीअधिक प्रमाणात हीच स्थिती असल्याने त्याचा राज्याच्या एकूण निर्यातीवर परिणाम होणार असल्याचे द्राक्ष निर्यातदार तुषार भास्करराव शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.गतवर्षी राज्यातून एकूण ९६०० कंटेनर द्राक्षांची निर्यात झाली होती. त्यातील १२०० ते १४०० कंटेनर यूके, ७२०० कंटेनर युरोप आणि १३०० कंटेनर माल बांगलादेश आणि इतर परदेशी बाजारपेठेत गेला होता. एका कंटेनरमध्ये साधारणत: १२००० ते १४४०० किलो माल असतो. सर्वसामान्यपणे ५, ८.५० आणि ९ किलो याप्रमाणे द्राक्षांची बॉक्स पॅकिंग केली जाते. कंटेनरमध्ये कोणत्या वजनाचे बॉक्स भरलेले आहेत त्यानुसार कंटेनरमधील एकूण मालाचे वजन ठरते.गत वर्षी सुमारे सव्वादोन लाख टन द्राक्षांची निर्यात झाली होती. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी राज्यभरातून केवळ पाच ते सहा हजार कंटेनर माल परदेशी बाजारपेठेत जाण्याचा अंदाज आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात निर्यातक्षम मालाचे प्रमाण कमी राहील. १५ फेब्रुवारीनंतर मार्च महिन्यात निर्यात चांगली राहू शकते. एप्रिल महिन्यात निर्यातीवर २० टक्क्यांनी फरक पडू शकतो, असा अंदाज सह्याद्री फार्म्स प्रोड्युसर कंपनीचे चेअरमन विलास शिंदे यांनी वर्तविला आहे.निर्यातक्षम द्राक्षांना मागील वर्षी सुरुवातीला ७० ते ७५ रुपये किलोचा दर मिळाला होता. यावर्षी दर चांगले राहण्याचा अंदाज असून, बागलाण तालुक्यात सध्या निर्यातक्षम द्राक्षांना १०० ते ११५ रुपये दर मिळत आहे. परदेशात पांढरे, लाल आणि काळ्या अशा तीनही द्राक्षांना चांगली मागणी आहे. पांढरे थॉमसन या वाणाच्या द्राक्षांना सध्या १०० ते ११५ रुपये, लाल क्रिमसनला १४५ ते १६० रुपये किलोचा दर मिळत असून, काळ्या वाणाचे दर अद्याप जाहीर झाले नसले तरी या वाणालाही १२५ रुपयांपासून पुढे दर मिळण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. नाशिक जिल्ह्यातून सर्वच वाणांची निर्यात होत असते, तर नाशिकपाठोपाठ द्राक्ष पिकविणाºया सांगली जिल्ह्यातील सोनाका, माणिक, चमण या लांब आकाराच्या द्राक्षांना चांगली मागणी असते.परदेशात भारतीय द्राक्षांना पेरू, चिली आणि इजिप्त या देशांमधील द्राक्षांशी स्पर्धा करावी लागते. पेरू आणि चिलीमधील पीकस्थिती चांगली असेल तर त्याचा आपल्याकडील दरावर परिणाम होत असतो. इजिप्तमधून सध्या अर्ली द्राक्षही येऊ लागली आहेत. या देशांमधील माल संपल्यानंतर १५ ते २० मार्चनंतर केवळ आपल्याकडील माल असल्याने फारशी स्पर्धा नसते.नाशिक जिल्ह्यात सध्या एकूण द्राक्ष लागवडीपैकी ४० टक्के माल निर्यातक्षम असून, फेब्रुवारीपासून हा माल निघण्यास सुरुवात होण्याचा अंदाज आहे. यावर्षी उभ्या असलेल्या पिकाचा अंदाज पाहता निर्यातीसाठी द्राक्ष कमी उपलब्ध होतील, मात्र उपलब्ध मालाला चांगला दर मिळेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.नेदरलँडला पसंतीद्राक्ष निर्यातदारांची नेदरलॅँडला सर्वाधिक पसंती असल्याचे दिसून येत असून, मागील चार वर्षांत दहा प्रमुख विदेशी बाजारपेठांपैकी नेदरलॅँडला सर्वाधिक द्राक्ष निर्यात झाल्याचे दिसून येते. रशिया आणि यूकेतही भारतीय द्राक्षांना चांगली मागणी असल्याने या देशांतील बाजारपेठांंमध्येही मोठ्या प्रमाणात द्राक्षांची निर्यात होत असल्याचे दिसून येते.परतीच्या पावसामुळे सप्टेंबरमधील माझ्या चार प्लॉटवरील द्राक्षांचे नुकसान झाले आहे. यातून उत्पादन खूपच कमी निघेल. सप्टेंबरच्या बागांना दर नसला तरी आॅक्टोबरच्या बागांना चांगला दर मिळेल. पावसाचा या बागांवर फारसा परिणाम झालेला नाही. पावसामुळे द्राक्षांवर डावणीबरोबरच कूजचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे मोठे नुकसान झाले असून, उत्पादनावर परिणाम होईल. सध्या निर्यातक्षम थॉमसनला १०० ते १२० रुपये प्रतिकिलोचा दर मिळत आहे.- चंद्रभान जाधव, द्राक्ष उत्पादक शेतकरी, निफाड