शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

बोगस शासन आदेश काढून दिव्यांग शाळांनी लाटले अनुदान; औरंगाबाद, बीड, लातूरमधील शाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2020 02:42 IST

सामाजिक न्याय विभाग वसुली करणार

विश्वास पाटीलकोल्हापूर : सामाजिक न्याय व विशेष कल्याण विभागाच्या नावाने बोगस शासन आदेश काढून त्या आधारे अनुदान लाटल्याचा प्रकार गतवर्षी उघडकीस आला आहे. या आदेशानुसार कोणताही लाभ दिला असल्यास त्याची वसुली करण्याचे व यापुढील लाभ थांबवण्याचे आदेश, या विभागाने दिव्यांग कल्याण आयुक्तांना दिले आहेत. असा लाभ झाल्याचा संशय असणाऱ्या दहा शाळा औरंगाबाद, बीड, लातूर जिल्ह्यातील आहेत. विशेष म्हणजे, यातील निम्म्या शाळा या सध्याच्या सामाजिक न्याय मंत्र्यांच्या जिल्ह्यातील आहेत. त्यांनीच या शाळांची चौकशी लावली आहे.

मूळचा बोगस आदेश कुणीतरी (शासन निर्णय क्रमांक इडीडी२०१९/प्र. क्र.९१/अ. क.१, दि ६.६.२०१९) गतवर्षी जूनमध्ये काढला आहे. तर हा आदेश खोटा असून त्या आधारे या दहा शाळांना काही लाभ दिले असल्यास त्याची वसुली करावी आणि भविष्यात कोणतेही लाभ देऊ नयेत, असे आदेश सामाजिक न्याय विभागाचे कक्ष अधिकारी सुनील कांबळे यांनी ६ आॅक्टोबर २०२० ला दिले आहेत. त्याला सामाजिक न्याय मंत्र्यांच्या ४ सप्टेंबरच्या खासगी सचिवांनी दिलेल्या टिपण्णीचा संदर्भ आहे. या शाळा ज्या जिल्ह्यातील आहेत तेथील स्थानिक अधिकाऱ्यांनी या आदेशाची खात्री न करताच कांही लाभ दिले असतील तर ते गंभीर आहे.या आदेशातील शाळा अशा१. संत गजानन महाराज सेवाभावी संस्था संचलित अपंग निवासी विद्यालय बीड.२. शिवशारदा ग्रामविकास मंडळाची निवासी अपंग शाळा फुलंब्री३.निवासी मतिमंद विद्यालय सिल्लोड जि औरंगाबाद४. त्वरितादेवी सेवाभावी संस्थेचे निवासी मतिमंद विद्यालय औरंगाबाद५.केशवराव धांडे मतिमंद निवासी विद्यालय तळवडा (ता.गेवराई)६. शिवशारदा शिक्षण मंडळाची निवासी मूकबधिर विद्यालय, वाशी (जि.उस्मानाबाद)७. ग्रामीण विकास महिला संस्थेचे साईनाथ मतिमंद विद्यालय, बीड८. ओमशांती महिला मंडळाचे राजीव गांधी मतिमंद विद्यालय, निलंगा९. संतोषी माता संस्थेची मूकबधिर शाळा बीड.१०. संतोषी माता संस्थेचे मतिमंद विद्यालय.

टॅग्स :Schoolशाळाfraudधोकेबाजी