शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

नात जन्मल्याचा आनंद, हेलिकॉप्टरमधून आणले घरी; स्वागताचा जंगी सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 11:45 IST

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

पुणे : ‘कन्यारत्न येती घरा, हर्षाला नसे सीमा’ या ओळी सार्थक ठरवीत बालेवाडी येथील शेतकरी अजित पांडुरंग बालवडकर यांनी ‘मुलगी हीच आपल्या वंशाचा दिवा आहे’ असं समजून नातीच्या जन्माचे जंगी स्वागत केले. सुनेचे माहेर मांजरी फार्म शेवाळवाडी, पुणे येथून सासरी पाटील वस्ती बालेवाडी पुणे येथील निवासस्थानी  नातीला आणि सुनेला चक्क  हेलिकॉप्टरने त्यांनी घरी आणले. 

 अजित पांडुरंग बालवडकर आणि संगीता अजित बालवडकर यांचा मुलगा कृष्णा बालवडकर, सून अक्षता बालवडकर यांना पहिला मुलगा क्रियांश असून, दुसरी मुलगी क्रिशिका आहे.  अजित बालवडकर यांची इच्छा होती की, शाही थाटात नातीचे स्वागत करायचे, म्हणून माहेरातून सुनेला व  क्रिशिका नातीला आणण्यासाठी त्यांनी चक्क हेलिकॉप्टर पाठविले. एवढेच नव्हे तर पाटील वस्ती बालेवाडी पुणे येथे हेलिपॅड निर्माण करण्यात आला.  घरी वाजत, गाजत, फुलांनी सजविलेल्या कारने नातीला घरी आणले. 

मागास विचारांना तिलांजलीनातीला चक्क हेलिकॉप्टरने घरी आणल्याचा आजोबांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. अजित पांडुरंग बालवडकर यांनी याद्वारे ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ असा संदेशही दिला. भौतिकदृष्ट्या समाज कितीही सुधारला असला, तरी आजही ग्रामीण भागात मुलगी म्हणजे ओझे अशीच चुकीची समजूत कायम असल्याचे उघडकीस येणाऱ्या भ्रूणहत्यांवरून समोर येते. याला तिलांजली देत मुलीच्या जन्माच्या या जंगी स्वागताचे त्यामुळेच सर्वत्र कौतुक होत आहे.