लोकमत न्यूज नेटवर्कमाणगाव : पन्हाळघर खुर्द व पन्हाळघर बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये शासकीय सेवेतील ग्रामसेवक तुषार हाटकर याने शासकीय कराचा अपहार केला. २१ जून २०१४ ते २८ नोव्हेंबर २०१६ दरम्यान त्याने ग्रामपंचायतीची घरपट्टी, पाणीपट्टी वसूल केलेली एकूण २२ लाख ४१ हजार १११ रुपये कराची रक्कम सरकारी खात्यात जमा न करता ती गायब केली. नंतर त्याचा हिशोबही दिला नाही. या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माणगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.
ग्रामसेवकाने केला २२ लाखांचा अपहार
By admin | Updated: June 9, 2017 05:04 IST