शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
2
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
3
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
4
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
5
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
6
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
7
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
8
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
9
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
10
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
11
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
12
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
13
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
14
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
15
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
16
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
17
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
18
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
19
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
20
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर

ग्रामपंचायती होणार मालामाल

By admin | Updated: July 11, 2017 00:37 IST

ग्रामपंचायतीने त्यांच्या हद्दीमधील इमारतीच्या नोंदी राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे करण्याचे काम सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : ग्रामपंचायतीने त्यांच्या हद्दीमधील इमारतीच्या नोंदी राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे करण्याचे काम सुरू आहे. या इमारतीच्या नोंदीचे काम अंतिम टप्प्यामध्ये आहे. या नोंदीमुळे ग्रामपंचायतीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. एकट्या हवेली तालुक्यातील गेल्या वर्षी ७२ कोटी घरपट्टी मिळणार होती. मात्र, यंदा नव्याने बांधकामाच्या मोठ्या प्रमाणात नोंदी झाल्या आहेत. त्यामुळे फक्त हवेली तालुक्यातील ग्रामपंचायतीकडून पुढील वर्षी तब्बल शंभर कोटींची घरपट्टी वसूल होणार आहे. ग्रामविकास विभागाने ग्रामपंचायतींना गावाच्या हद्दीतील इमारतीचे नोंदी करून कर वसूल करण्याचे अधिकार दिले आहे. जिल्ह्यामध्ये १ हजार ४०७ ग्रामंपचायती आहेत. या ग्रामपंचातीने शंभर टक्के कर वसुली केल्यास ग्रामपंचायत विभागाचे उत्पन्न शंभर कोटीने वाढण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मिळकतीचे सर्वेक्षण करून, नोव्हेंबरपासून कर वसूल करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून दिला होता. मात्र, जिल्हा परिषद निवडणुका आणि इतर कामे असल्याने नोंदी करण्याचे काम संथ गतीने सुरू होते. या निवडणुकानंतर नोंदीच्या कामांना वेग आला आहे. जवळपास नोंदीचे काम पूर्ण होत आले आहे. शहरालगतच्या गावांमध्ये गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर बांधकामे उभी राहिली. त्यात विनापरवानगी बांधकामांची संख्याही मोठी आहे. कर आकारणी न झाल्यामुळे अनेक ग्रामपंचायतींची आर्थिक घडी विस्कटली होती. मात्र, आता गावाच्या हद्दीतील सर्व इमारतींच्या नोंदी होणार असल्याने, ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढणार आहे.गावच्या ग्रामपंचायत हद्दीतील इमारतीचे नोंदी करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या नोंदीनंतर इमारत नोंदी नमुना आठवरून अनधिकृत आणि अधिकृत इमारतीची माहिती मिळणार आहे. या नोंदीमुळे या ग्रामपंचायतीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. जिल्ह्यातील हवेली, मावळ, मुळशी, खेड, शिरूर, बारामती आणि दौंड या तालुक्यांमध्ये शहरालगतच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात बांधकाम झाले आहेत. यामुळे या तालुक्यातील ग्रामपंचायतीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. - संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग>जिल्ह्यात २०९ कोटी ६ लाखांची घरपट्टी वसुली : कोहिनकरराज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे ग्रामपंचायत हद्दीमधील इमारतीच्या नोंदी करणे आणि करवसुलीचे काम सुरू केले आहे. या वर्षी जिल्ह्यातील १ हजार ४०७ ग्रामपंचायतींमधून २५० कोटी वसुली करण्याचे उद्दिष्ट होते. यापैकी आजअखेर २०९ कोटी ६ लाख रुपयांची घरपट्टी वसुली झाली आहे, अशी माहिती जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी दिली.राज्य शासनाने ग्रामपंचायतीकडून एक वर्षापासून करवसुली करण्याचे आदेश स्थगित केले होते. तसेच पाच वर्षांपूर्वी ग्रामपंचायतींकडून दिली जाणारी बांधकामे परवानगी आणि बांधकामांच्या नोंदी करण्याचे अधिकार गोठवणारे आदेश यापूर्वी काढण्यात आले होते. या आदेशांमुळे ग्रामपंचायत हद्दीतील कोणत्याही बांधकामाची नोंद झालेली नाही. शहरालगतच्या गावांमध्ये गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर बांधकामे उभी राहिली. त्यात विनापरवानगी बांधकामांची संख्याही मोठी आहे. या इमारतींच्या नोंदी नमुना ८ मध्ये न झाल्याने त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची कर आकारणी करणे ग्रामपंचायतीला शक्य झाले नाही. त्याउलट या इमारतींमध्ये सदनिकाधारक राहण्यास आल्याने त्यांना द्याव्या लागणाऱ्या सुविधांचा बोजा ग्रामपंचायतींवर पडत राहिला. कर आकारणी न झाल्यामुळे अनेक ग्रामपंचायतींची आर्थिक घडी विस्कटली. त्यामुळे या करपात्र इमारतींच्या नोंदी ग्रामपंचायतीकडील नमुना आठमध्ये करण्यास पुन्हा परवानगी देण्याची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली होती. या मागणीनुसार ग्रामविकास विभागाने गावाच्या हद्दीतील इमारतीच्या नोंदी करून करवसुली करण्याचे अधिकार ग्रामपंचायतींना दिले आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मिळकतीचे सर्वेक्षण करून, कर वसूल करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून दिला होता. त्यानुसार ग्रामसेवकांनी मागील थकबाकी तसेच चालू घरपट्टी वसूल केली जात आहे. याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी सांगितले की, जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायतीकडून मागील वर्षीची ८८ कोटी ११ लाख १८ हजार कराची वसुली करणे बाकी आहे. तसेच या वर्षी १६२ कोटी १५ लाखांची घरपट्टी अशी एकूण २५० कोटी घरपट्टीची वसुली करण्याचे उद्दिष्ट होते. यापैकी आत्तापर्यंत २०९ कोटी ६ लाख ५६ हजार करवसुली झाली आहे. जवळपास ८३ टक्के घरपट्टी वसुली झाली.>सर्वांत जास्त हवेली तालुक्यातून घरपट्टी वसूल : हवेली ५७ कोटी ४ लाख, मुळशी ३० कोटी ७९ लाख, शिरूर २४ कोटी ८९ लाख ६ हजार, खेड २३ कोटी २७ लाख ३४ हजार, मावळ २१ कोटी ८४ लाख ५२ हजार, बारामती १२ कोटी ९७ लाख ८५ हजार, जुन्नर १० कोटी ३८ लाख, दौंड ८ कोटी १२ लाख ७७ हजार, इंदापूर ५ कोटी ८९ लाख, भोर ४ कोटी ७० लाख २६ हजार, आंबेगाव ३ कोटी ८४ लाख ७४ हजार, पुरंदर ३ कोटी ७६ लाख ४३ हजार, वेल्हा १ कोटी ५२ लाख सर्वांत जास्त हवेली तालुक्यातून घरपट्टी वसूल झाली आहे.