समीर देशपांडेकोल्हापूर : आता प्रत्येक ग्रामपंचायतीची वेबसाइट नव्याने विकसित होणार असून या माध्यमातून त्या गावचा इतिहासही जगासमोर येणार आहे. आतापर्यंत सूचना दिल्यानंतरही अनेक ग्रामपंचायतींनी वेबसाइट विकसित करण्याकडे दुर्लक्ष केले होते. परंतु, आता ग्रामविकास विभागाने ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’च्या पार्श्वभूमीवर या वेबसाइट कशा पद्धतीने विकसित करावयाच्या आहेत याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीचा जमा-खर्चही जगाला कळणार आहे.राज्यात या अभियानाला १७ सप्टेंबरपासून सुरुवात झाली असून, ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ते चालणार आहे. यासाठी राज्य, जिल्हा आणि तालुका पातळीवर अव्वल येणाऱ्या ग्रामपंचायतींना तब्बल २४५ कोटी रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. यासंदर्भात झालेल्या बैठकीमध्ये ग्रामविकास मंत्रीजयकुमार गोरे आणि प्रधान सचिव यांनी या वेबसाइटबाबत सविस्तर सूचना केल्या आहेत.या वेबसाइटवर मुख्यपृष्ठ, ग्रामपंचायतीबद्दल माहिती, प्रमुख प्रकल्प आणि उपक्रम, योजना आणि लाभार्थी माहिती, घोषणा आणि परिपत्रके, ग्राम पायाभूत सुविधा, अर्थसंकल्प आणि पारदर्शकता, नागरिक सेवा आणि फॉर्म्स, आमचे गाव, ओळख आणि संस्कृती, रोजगार आणि कौशल्य विकास, शिक्षण आणि युवक कोपरा, तक्रार निवारण आणि फीडबॅक, पर्यावरण आणि शाश्वत विकास अशा १३ घटकांच्या माध्यमातून ग्रामपंचायतीचा कारभारच वेबसाइटच्या माध्यमातून जगासमोर येणार आहे.
गावाचा इतिहासही समजणारया वेबसाइटवर प्रत्येक गावाचा इतिहासही मांडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्या गावातील पर्यटनस्थळे, मंदिरे, गावाची वैशिष्ट्ये, लोककला आणि संगीत परंपरा, स्वातंत्र्यसैनिक, कलाकार, शिक्षक यांच्यासह प्रमुख मान्यवर, गौरवशाली व्यक्तींची माहिती तसेच स्थानिक गावातील उत्पादनांची सविस्तर माहिती या वेबसाइटवर देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.वेबसाइट म्हणजे आरसाकेंद्र आणि राज्य शासन जी ग्रामविकासाची उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून कोट्यवधी रुपयांचा निधी देते. त्या प्रत्येक घटकासाठी ग्रामपंचायतीने नेमके काय केले हे आता या वेबसाईटच्या माध्यमातून मांडावे लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीची वेबसाइट म्हणजे ग्रामपंचायतीच्या कारभाराचा आरसाच ठरणार आहे.
ग्रामविकास विभागाकडून वेबसाइट विकसित करण्यासाठी सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार अधिकाधिक माहिती देणाऱ्या, प्रभावी वेबसाइट निर्मिती करण्याबाबत ग्रामपंचायतींना सूचना देण्यात आल्या आहेत. - जयवंत उगले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, (ग्रामपंचायत) जिल्हा परिषद, कोल्हापूर
Web Summary : Every Gram Panchayat will now have a website detailing its history, projects, and financial transactions. This initiative, under the 'Mukhyamantri Samruddha Panchayatraj Abhiyan,' aims for transparency. The website will also showcase local culture, employment initiatives, and grievance redressal mechanisms, acting as a mirror to the Gram Panchayat's operations.
Web Summary : अब हर ग्राम पंचायत की वेबसाइट पर इतिहास, परियोजनाएं और वित्तीय लेनदेन का विवरण होगा। 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान' के तहत यह पहल पारदर्शिता लाने के लिए है। वेबसाइट स्थानीय संस्कृति, रोजगार पहल और शिकायत निवारण तंत्र को भी प्रदर्शित करेगी, जो ग्राम पंचायत के कामकाज का दर्पण होगी।