शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

पदवीधर, शिक्षक निवडणुकांचे बिगुल वाजले, १ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर दरम्यान अर्ज नोंदणीची मुदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 06:50 IST

अंतिम मतदार यादी ३० डिसेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार

मुंबई : नाशिक व अमरावती या विभागांमध्ये पदवीधर मतदारसंघाच्या; तर औरंगाबाद, नागपूर व कोकण या विभागांमध्ये शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका २०२३ मध्ये होणार आहेत; मात्र  त्यासाठी नोंदणी प्रक्रिया येत्या १ ऑक्टोबरपासून सुरू होत असून ७ नोव्हेंबरपर्यंत पात्र शिक्षक व पदवीधरांना अर्ज करण्याची मुदत राहणार असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव श्रीकांत देशपांडे यांनी दिली. 

राज्यात पुढील वर्षी होणाऱ्या शिक्षक व पदवीधर निवडणुकीसाठी मतदार नाव नोंदणी मोहीम सुरू करण्यासंदर्भात देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला उपमुख्य निवडणूक अधिकारी शरद दळवी उपस्थित होते. 

महत्त्वाचे म्हणजे पदवीधर तसेच शिक्षक मतदारसंघाच्या मतदार नोंदणीसाठी राजकीय पक्ष, मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी किंवा रहिवासी कल्याणकारी संस्थांकडून एकगठ्ठा स्वरूपात प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नसल्याचे श्रीकांत देशपांडे यांनी स्पष्ट केले. पदवीधर व शिक्षक मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी २३ नोव्हेंबर रोजी प्रसिद्धी केली जाईल, अंतिम मतदार यादी ३० डिसेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती देशपांडे यांनी यावेळी दिली.

निवडणूक जानेवारीत? नाशिक, अमरावती पदवीधर मतदारसंघ, तर औरंगाबाद, नागपूर, कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात ही निवडणूक होणार असून या जागांवरील सदस्यांची मुदत ७ जानेवारी २०२३ रोजी संपत आहे. त्यामुळे जानेवारीत निवडणूक होण्याची शक्यता आहे. मुदत संपत असलेल्या शिक्षक आमदारांत औरंगाबादचे विक्रम काळे, कोकणचे बाळाराम पाटील, तर पदवीधर मतदारसंघातील नागपूरचे आमदार नागो गाणार, अमरावतीचे डॉ. रणजित पाटील, नाशिकचे डॉ. सुधीर तांबे यांचा समावेश आहे. कसा करावा अर्ज?

  • पदवीधर मतदारसंघासाठी अर्ज क्र. १८ भरून पदवीधर मतदार नोंदणी करू शकतात. 
  • अर्ज संबंधित विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी तसेच तहसील कार्यालयात उपलब्ध.
  • अर्जासोबत पदवी प्रमाणपत्राची किंवा गुणपत्रिकेची साक्षांकित छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे. 
  • १ ऑक्टोबरपर्यंत पदवीधर मतदारसंघाकरिता ऑनलाईन नोंदणीची सुविधा देण्याचा प्रयत्नही करण्यात येणार आहे.
टॅग्स :Electionनिवडणूक