शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

एसटीतील पदवीधर वाहक लिपिक होणार, सर्वाधिक लाभ होणार महिला वाहकांना !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2017 08:49 IST

राज्य मार्ग परिवहनमध्ये कार्यरत पदवीधर वाहकांना आता लिपिक-टंकलेखक पदाकरिता अर्ज करण्याची संधी देण्यात येणार आहे.

ठळक मुद्देराज्य मार्ग परिवहनमध्ये कार्यरत पदवीधर वाहकांना आता लिपिक-टंकलेखक पदाकरिता अर्ज करण्याची संधी देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे एसटीतील पदवीधर वाहकांचा लिपिक बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुंबई, दि. 27 - राज्य मार्ग परिवहनमध्ये कार्यरत पदवीधर वाहकांना आता लिपिक-टंकलेखक पदाकरिता अर्ज करण्याची संधी देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे एसटीतील पदवीधर वाहकांचा लिपिक बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयाचा सर्वाधिक लाभ महिला वाहकांना होणार असल्याचा दावा एसटी महामंडळाने केला आहे.

एसटीमध्ये ५ जानेवारी २०१७पासून भरती प्रक्रिया सुरू आहे. एकूण १४ हजार पदांपैकी सुमारे २ हजार २०० लिपिक-टंकलेखक पदांचा यात समावेश आहे. गुरुवारी वरिष्ठ अधिका-यांच्या बैठकीत सध्या कार्यरत असलेल्या पात्र वाहकांना या परीक्षेच्या माध्यमातून लिपिक-टंकलेखक पदावर पदोन्नती देण्याच्या योजनेस परिवहनमंत्री आणि एसटीचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी मान्यता दिली.

एसटी महामंडळाच्या वायफाय सुविधेचा बोजवारा, लाखो रुपये खर्च करूनही मिळत नाही सेवा, प्रवाशांमध्ये नाराजी -

प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एसटी महामंडळाने बसमध्ये लाखो रुपये खर्च करून वायफाय सुविधा महाराष्ट्रभर सुरू केली. सध्या मात्र बसमधील ही सुविधा बारगळल्याने प्रवाशांच्या मनोरंजनावर विरजण पडल्याचे दिसून येत आहे.महाराष्ट्रात दिवस-रात्र हजारो बसमधून लाखो प्रवासी प्रवास करतात. शहरांसह ग्रामीण भागातील प्रवाशांना प्रवास करताना मोबाइलवर आनंद मिळावा म्हणून ही सुविधा सुरू केली. बसमध्ये वायफाय मशिन असून अडचण नसून खोळंबा या म्हणीप्रमाणे बुजगावणे म्हणून पाहण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. राज्य महामार्गावर एसटी महामंडळाच्या हजारो बस धावतात.लांब पल्ल्यांच्या बसमध्ये प्रवाशांचे मनोरंजन व्हावे, या हेतूने ही वायफाय सुविधा बसमध्ये सुरू करण्यात आली. बहुतांशबसमध्ये वायफाय मशिन आहे, पण त्या बंद अवस्थेत आहेत. याबाबत चालक व वाहकांना विचारले असता, या मशिन बसमध्ये बसविल्यापासून बंदच आहेत. वायफाय सुविधा सुरू झालीच नाही. प्रवाशांना हे मशिन फक्त शो पीस म्हणून पाहावे लागत आहे.एसटीमध्ये वायफाय सुविधा उपलब्ध असेल या अपेक्षेने प्रवासी बसमधून प्रवास करतात. मात्र, ऐनवेळी वायफाय बंद असल्याचे समजताच प्रवाशांमध्ये निराशा पसरते. तरी एसटी प्रशासनाने याची दखल घेऊन एसटीमध्ये ही सुविधा विनाअडथळा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.एसटीचे घोषवाक्य ठरतेय निरर्थकशासनाच्या वतीने अनेक योजना जाहीर केल्या जातात, मात्र प्रभावीपणे राबविल्या जात नाहीत. लाभधारकांना प्रत्यक्ष त्या योजनेचा लाभ मिळतो किंवा नाही या गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे अनेक योजना बारगळल्याचे दिसून येत आहे. एसटीमध्ये प्रवास, करमणूक हमखास हे घोषवाक्य निरर्थक आहे. यामुळे प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.पिंपरी-चिंचवडमधील वल्लभनगर आगारामध्ये ५८ बस आहेत. त्या सर्व बसमध्ये वायफाय सुविधा सहा महिन्यांपासून सुरू आहे. एखाद्या बसमधील वायफाय मशिन बंद पडल्यानंतर कर्मचारी लगेच दुरुस्त करून घेतात. ही प्रवाशांसाठीची वायफाय सुविधा प्रभावीपणे राबविणार आहे.- अनिल भिसे,आगार व्यवस्थापक, वल्लभनगरशिवाजीनगर आगारातील तीन बस शालेय सहलीसाठी आणल्या होत्या. त्या तीनही बसमध्ये वायफाय सुविधा मशिन होत्या. मात्र या मशिन बंद अवस्थेत होत्या. ही सुविधा पूर्णत: फसवी असल्यामुळे प्रवाशांची दिशाभूल होत आहे. पीएमपीप्रमाणे कर्तव्यदक्ष अधिकाºयांची नितांत आवश्यकता आहे.- बिपीन बनकर, शिक्षक, औंध