शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

सरकार आरक्षण देईल पण जरांगे पाटलांचा जीव वाचला पाहिजे; रामदास आठवलेंचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 18:09 IST

केवळ मराठा समाजाचा प्रश्न नाही तर क्षत्रिय विषय आहे. उद्धव ठाकरेंनी सूचना केल्याप्रमाणे पंतप्रधान यांना भेटून हा विषय मांडू असंही रामदास आठवलेंनी म्हटलं.

मुंबई – मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही सर्वात पहिली मागणी मी आणि माझ्या पक्षाने केली होती. सगळ्याच मराठ्यांना आरक्षण नको, परंतु ज्यांचे उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी आहे अशांना आरक्षण द्यावे. मराठा समाजाची आंदोलनं याआधी तीव्र झालेली नाही. परंतु आता आंदोलन तीव्र झालं आहे. टोकाची भूमिका घेणे योग्य नाही. सरकार आरक्षण देईल पण जरांगे पाटलांचा जीव वाचला पाहिजे असं विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

रामदास आठवले म्हणाले की, सध्या मराठा आरक्षणाचा विषय तीव्र झालेला आहे. जरांगे पाटील आणि इतर नेते उपोषणास बसले आहेत. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी प्रयत्न करत आहेत. राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक घेतली. सरकार आरक्षण देईल पण जरांगे पाटील यांचा जीव वाचला पाहिजे. अनेकांनी मागणी केली आहे की एक दिवसांचं अधिवेशन घ्यावं पण माझीही मागणी आहे की दोन दिवस अधिवेशन बोलवून चर्चा करावी. तामिळनाडूमध्ये ६९ टक्के आरक्षण आहे.  राजस्थानला ६५ टक्के आरक्षण आहे. इतरांना अडचणीत न आणता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत माझ्या खात्याच्या निगडित काही प्रश्न आहेत. मराठा समाजात गरीब मराठ्यांची संख्या आहे. लवकर निर्णय घ्यावा पण थोडा वेळ याला लागू शकतो. जरांगे पाटील यांनी त्यावर विचार करावा. सरकारला वेळ देणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात आंदोलन होतायत. कायदा हातात घेऊ नका. केवळ मराठा समाजाचा प्रश्न नाही तर क्षत्रिय विषय आहे. उद्धव ठाकरेंनी सूचना केल्याप्रमाणे पंतप्रधान यांना भेटून हा विषय मांडू असंही रामदास आठवलेंनी म्हटलं.

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यायला सांगितलं म्हणून देणार नाही. त्यांच्या काळात हा मुद्दा होता त्यांना हाताळता आला नाही. इतरांना अडचणीत न आणता मराठा समाजाला आरक्षण द्यावं ओबीसीत कोणाला टाकायचं याचा आमच्या मंत्रालयाला प्रस्ताव दिला तर आम्ही ते पुढे करू आणि आरक्षण देण्याचा प्रयत्न करु. मी माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सूचना केली आहे की जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आपण देखील आंदोलन करा. इतर राज्याच्या आरक्षणाचा अभ्यास करून आपल्याकडे काय करता येतंय याचा विचार राज्य सरकारने करावा. जरांगे यांची गरज मराठा समाजाला आहे. त्यांच्या भूमिकेने मराठा समाज खडबडून जागा झाला आहे असंही आठवलेंनी सांगितले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणRamdas Athawaleरामदास आठवलेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील