शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

गोविंदा रे गोपाळा...!

By admin | Updated: August 26, 2016 02:11 IST

पनवेल तालुक्यात दहीहंडी गोपाळकाला उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

पनवेल : पनवेल तालुक्यात दहीहंडी गोपाळकाला उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. न्यायालयाच्या निर्बंधामुळे अनेक ठिकाणी दहीहंडी पथक फिरकलेच नाही. खारघर, कळंबोली, कामोठे, खांदा कॉलनी आदी ठिकाणी राजकीय पक्षांनी दहीहंड्या उभारल्या होत्या. दहीहंडी पथकांना आकर्षित करण्यासाठी अनेक मंडळांनी लाखो रुपयांचे बक्षीस ठेवले होते. उलवे नोडमध्ये देखील भाजपाच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. भूमिपुत्र भवनसमोरील मैदानात अनोख्या पद्धतीच्या व न्यायालयाच्या आदेशानुसार दहीहंडी उत्सव साजरा केला. दहीहंडी उत्सव २0१६ अशी ही स्पर्धा रंगली. दहीहंडीत चार थर लावणाऱ्या पथकास १0 हजार रोख व चषक, तर तीन थरावर सलामी देणाऱ्या गोविंदा पथकाला ५ हजार रुपये देण्यात आले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे नगराध्यक्ष महेश बालदी, अरुणशेठ भगत आदी उपस्थित होते. तालुक्यातील ग्रामीण भागात देखील पारंपरिक पद्धतीने दहीहंडी फोडण्यात आली. गावात दुपारी १२ वाजता या दहीहंडी फोडण्यास सुरु वात झाली. खारघर, कोपरा, टेभोंडे, वळवली आदी गावात मोठ्या उत्साहात दहीहंडी सण साजरा करण्यात आला. (प्रतिनिधी)>पनवेल शहरातील बापट वाड्यातील दहीहंडी ही नेहमीच याठिकाणचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेली असते. शहरात नवनाथ महाराजांचे अस्थान स्थापन केलेले आहे. या अस्थानाची पारंपरिक पद्धतीने पूजा अर्चा करून बापट वाड्यात शहरातील मानाची दहीहंडी फोडली जाते. यावेळी शहरातील गोविंदा येऊन पारंपरिक पद्धतीच्या दहीहंडीत सहभागी होत असतात. यावेळी जमलेले गोविंदा एका विशेष भाषेत एकमेकांशी संवाद साधत असतात. त्यानंतर जमलेल्या गोविंदांना मोठ्या दोरखंडाने अंगावर फटके मारले जातात. शेकडो वर्षांपासून ही परंपरा चालत आलेली आहे. यंदाचे या दहीहंडीचे १५0 वे वर्ष होते.