शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पालघरमध्ये दहीहंडी फोडताना एका गोविंदाचा मृत्यू  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2017 21:03 IST

राज्यात दहीहंडीचा उत्सव  आज जल्लोषात साजरा होत असताना पालघरमध्ये दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट लागले आहे. पालघर तालुक्यातीसल धनसार (काशीपाडा) येथे एका गोविंदाचा दहीहंडी फोडताना वरच्या थरावरून पडून मृत्यू झाला आहे. 

पालघर, दि. 15 - राज्यात दहीहंडीचा उत्सव  आज जल्लोषात साजरा होत असताना पालघरमध्ये दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट लागले आहे. पालघर तालुक्यातीसल धनसार (काशीपाडा) येथे एका गोविंदाचा दहीहंडी फोडताना वरच्या थरावरून पडून मृत्यू झाला आहे. रोहन गोपिनाथ किणी (21) असे या मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे. दहीहंडी फोडण्यासाठी वरच्या थरावर चढला असताना तो फिट येऊन खाली पडला. खाली पडल्याने मार बसून तो जबर जखमी झाला. त्यानंतर त्याला पालघर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. वरच्या थरावरून दहीहंडी फोडत असताना फिट आल्याने तो खाली पडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दरम्यान, या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.  मुंबईत दहीहंडीच्या थरारात 46 गोविंदा जखमीमुंबईमध्ये आज सकाळपासूनच दहीहंडीचा जल्लोष दिसून येत आहे. मात्र या थरारामध्ये उंचच उंच थर रचण्याच्या नादात अनेक गोविंदा जखमी होत आहेत. आज सकाळपासून दहीहंडीच्या थरथराटात सुमारे 46 हून अधिक गोविंदा जखमी झाले आहेत. त्यापैकी  जबर मार लागलेल्या एका गोविंदाला जबर मार लागला असून, त्याला केईएम रुग्णालयात अतिदक्षता विभागात देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.    संध्याकाळी पाच वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार एकूण 35 गोविंदा जखमी झाले आहेत. प्राप्त आकडेवारीनुसार मुंबईतील नायर रुग्णालयात 1, केईएम रुग्णालयात 11, सायन येथील रुग्णालयात 10, सेंट जॉर्ज रुग्णालयात 1, नायर रुग्णालयात 1, जेजे रुग्णालयात 1 माहात्मा फुले रुग्णालय, विक्रोळी येथे 1, मुलुंडच्या आग्रवाल रुग्णालयात 4, व्ही. एन. देसाई रुग्णालयात 5, कूपर रुग्णालयात 4, डॉ. आंबेडकर रुग्णालय, कांदिवली येथे 4, ट्रॉमा केअर गोरेगाव येथे 3 अशा एकूण 46  गोविंदांना उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. त्यापैकी केईएम रुग्णालयात एका  गोविंदाला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.