शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपालांनी केले ते योग्यच - मुकुल रोहतगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 06:49 IST

बहुमताच्या पाठिंब्याविषयी आश्वस्त असल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण देणे हा राज्यपालांच्या अधिकारांचाच भाग असला, तरी त्यासाठी मध्यरात्रीची वेळ निवडणे थोडे खटकणारेच आहे

पणजी : बहुमताच्या पाठिंब्याविषयी आश्वस्त असल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण देणे हा राज्यपालांच्या अधिकारांचाच भाग असला, तरी त्यासाठी मध्यरात्रीची वेळ निवडणे थोडे खटकणारेच आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांच्यातर्फे सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करणारे माजी अ‍ॅटर्नी जनरल आणि सुविख्यात वकील मुकुल रोहतगी यांनी नोंदवली आहे. ‘दी वायर’ या वृत्तसंकेतस्थळासाठी करण थापार यांना दिलेल्या मुलाखतीत ते महाराष्ट्रातील ताज्या राजकीय घडामोडींवर विस्तृतपणे बोलले.अजित पवार यांच्यातर्फे फडणवीस यांच्या समर्थनार्थ राज्यपालांना देण्यात आलेल्या पत्रावर ५४ आमदारांच्या सह्या असलेल्या आपणही पाहिल्या असल्याचे रोहतगी यांनी या वेळी सांगितले. या सह्यांच्या खरेखोटेपणाची शहानिशा करण्यासाठी राज्यपालांकडे कोणतीही यंत्रणा उपलब्ध नसते; सह्या दबावाखाली घेतल्या आहेत का, याचीही खातरजमा ते स्वत:हून करू शकत नाहीत, ही बाब राज्यपालांच्या वर्तनावर टीका करणाऱ्यांनी ध्यानात ठेवायला हवी, असेही रोहतगी म्हणाले. राज्यपालांना फडणवीस यांच्याकडून देण्यात आलेल्या पत्राला समर्थन देणाºया पत्रावर भाजपचे १०५, १९ अपक्ष व अन्य आणि राष्ट्रवादीच्या ५४ आमदारांच्या सह्या होत्या, असेही ते म्हणाले.अजित पवार यांच्या बंडानंतर जयंत पाटील यांना शरद पवारांनी पक्षाचा विधिमंडळ नेता म्हणून नियुक्त केले, हे कसे, असे विचारले असता, हातात वेळोवेळी येणाºया कागदपत्रांच्या आधारे निर्णय घ्यायचे असतात, असे रोहतगी यांनी सांगितले. राष्ट्रपती राजवट ही लोकशाहीच्या आणि घटनेच्या दृष्टीने अयोग्यच आहे. निवडणुकांनंतर कोणताही राजकीय पक्ष सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत नव्हता. राज्यपालांनी विविध पक्षांना विचारून पाहिले. त्यामुळे राज्यपालांना राष्ट्रपती राजवटीची शिफारस करावी लागली. मात्र त्यांना जेव्हा पहिली संधी मिळाली, तेव्हा लोकनियुक्त सरकार सत्तेवर आणणे ही आपली जबाबदारी असल्याच्या भावनेने त्यांनी फडणवीसांना निमंत्रण दिले. असे करण्यामागे त्यांचा अन्य काही हेतू होता, असे आपल्याला वाटत नसल्याचे ते म्हणाले. या कृत्यामुळे राज्यपालपदाचे अवमूल्यन झाल्याचे आपल्याला वाटत नाही, अशा शब्दांत त्यांनी राज्यपालांचे समर्थन केले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019