शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
6
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
7
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
8
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
9
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
10
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
11
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
12
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
13
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
14
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
15
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
16
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
17
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
18
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
19
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा

राज्यपालांच्या विधानाने महाराष्ट्राचा अपमान नाही, सत्य परिस्थिती मांडली -  प्रकाश आंबेडकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2022 14:19 IST

राज्यपालांनी केलेल्या विधानाचं मी समर्थन करतो. जो मराठी माणूस आहे त्याने लक्षात घ्यावं काँग्रेस-राष्ट्रवादी, शिवसेना यांची प्रतिमा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उघड केली आहे असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितले.

पुणे - सध्या दोन जण मत व्यक्त करतात. एक देवेंद्र फडणवीस आणि दुसरे भगतसिंग कोश्यारी, फडणवीस हे स्वत:साठी मत व्यक्त करतात. पक्षासाठी मत व्यक्त करण्याची भूमिका राज्यपाल भगतसिंग कोश्यारी निभावतात. राज्यपालांची उचलबांगडी कशासाठी? राज्यपालांनी मराठी माणसाला इशारा दिला. इकडचा व्यापार एकतर गुजरातींकडे आहे नाहीतर मारवाड्यांकडे. राज्यपालांचा टोला काँग्रेस-राष्ट्रवादीतील मराठी नेत्यांना आहे असं मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला. 

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, इतके वर्ष काँग्रेस-राष्ट्रवादीनं राज्यात सत्ता केली. परंतु मराठी माणसाच्या हातात आर्थिक व्यवहार देऊ शकला नाही. राज्यपालांनी मराठी माणसाचे डोळे उघडे केले. त्यामुळे मराठी माणसांनी या बुजगावण्यांसोबत राहायचं की नवीन नेतृत्वामागे उभं राहायचं. राज्यपालांच्या विधानाने महाराष्ट्राचा बिल्कुल अपमान झाला नाही. त्यांनी सत्यपरिस्थिती मांडली. इथल्या राज्यकर्त्यांनी मराठी माणसांच्या हाती आर्थिक व्यवहार दिले नाही असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला. 

तसेच राज्यपालांनी केलेल्या विधानाचं मी समर्थन करतो. जो मराठी माणूस आहे त्याने लक्षात घ्यावं काँग्रेस-राष्ट्रवादी, शिवसेना यांची प्रतिमा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उघड केली आहे. इतकी वर्ष राज्य सांभाळूनही मराठी माणसांच्या हाती आर्थिक व्यवहार दिले नाही अशा शब्दात प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. 

राज्यपालांचा खुलासा मुंबई महाराष्ट्राचा स्वाभिमान तर आहेच. शिवाय ती देशाची आर्थिक राजधानी सुद्धा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणसाच्या या भूमीत राज्यपाल म्हणून मला सेवेची संधी मिळाली, याचा मला अभिमानच आहे. त्याचमुळे अतिशय अल्पावधीत मराठी भाषा अवगत करण्याचा मी प्रयत्न केला,” असं राज्यपाल म्हणाले. काल राजस्थानी समाजाच्या कार्यक्रमात मी जे विधान केले त्यात मराठी माणसाला कमी लेखण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता. केवळ गुजराती आणि राजस्थानी मंडळांनी व्यवसायात दिलेल्या योगदानावर मी बोललो. मराठी माणसांनीच कष्ट करून महाराष्ट्राला उभे केले. म्हणूनच आज अनेक मराठी उद्योजक नावाजलेले आहेत. ते केवळ महाराष्ट्रात नाही, तर भारतात आणि जगभरात मोठ्या दिमाखात मराठीचा झेंडा रोवून आहेत. त्यामुळे मराठी माणसाचे योगदान कमी लेखण्याचा कुठे प्रश्नच निर्माण होत नसल्याचं खुलासा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केला आहे.  

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी