शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Political Crisis: बहुमत चाचणी नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली नाही? राज्यपाल नेमू शकतात हंगामी अध्यक्ष! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 15:23 IST

Maharashtra Political Crisis: ठाकरे सरकारची बहुमत चाचणी उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली होणार की नाही, यावरून तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

मुंबई: शिवसेनेचे बडे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ३५ हून अधिक आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर आठवडाभरापासून राज्यातील राजकीय संघर्ष पराकोटीला पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे. आठवडभरापासून वेट अँड वॉचच्या भूमिकेत असलेल्या भाजपने अखेर या राजकीय नाट्यात उडी घेत थेट राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना बहुमत चाचणीचे पत्र दिले. यानंतर आता ३० जून रोजी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. मात्र, आताच्या घडीला विधानसभेला अध्यक्ष नाही. अशा परिस्थिती उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली बहुमत चाचणी होऊ शकते, असे सांगितले जात आहे. मात्र, यातच राज्यपाल आपल्या विशेषाधिकारांचा वापर करून हंगामी अध्यक्ष नेमू शकतात, अशी शक्यता विधितज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र पाठवले आहे. राज्यपालांनी विधीमंडळ सचिवांनाही पत्र पाठवले असल्याची माहिती आहे. ही बहुमत चाचणी उपाध्यक्ष नरहरी झिरवाळांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याचे बोलले जात असतानाच ज्येष्ठ विधिज्ञ जुगलकिशोर गिल्डा यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हंगामी अध्यक्षपदाची नेमणूक करू शकतात, असे म्हटले आहे. 

हंगामी अध्यक्षांची नेमणूक करू शकतात

तत्पूर्वी, न्यायाधीश केहर यांच्या घटनापीठाने सभागृहाच्या विद्यमान अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव प्रलंबित असताना त्यांच्याऐवजी हंगामी अध्यक्ष यांनी बहुमत चाचणीसाठीच्या विधिमंडळ अधिवेशनाची कारवाई पाहावी, असे निर्णय दिले होते, याचा दाखला देताना, या न्यायालयीन निर्णयाचा आधार घेऊन महाराष्ट्राचे राज्यपाल बहुमत चाचणीच्या विशेष अधिवेशनासाठी हंगामी अध्यक्षांची नेमणूक करू शकतात. अशा वेळेस सभागृहातील सर्वात जास्त अनुभवी आमदाराची हंगामी अध्यक्ष म्हणून नेमणूक केली जाते, असे जुगलकिशोर गिल्डा यांनी म्हटले आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते. 

दरम्यान, दुसरीकडे महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी विशेष अधिवेशन घेण्यात येणार असून, ठाकरे सरकारची बहुमत चाचणी उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याच अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रक्रियेसाठी  हंगामी अध्यक्ष निवडला जाण्याची शक्यता फारच कमी असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळMahavikas Aghadiमहाविकास आघाडीNarhari Jhariwalनरहरी झिरवाळbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी