शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

महाज्योतीच्या संशोधक विद्यार्थ्यांना निधी देण्यास सरकारची टाळाटाळ, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष

By संदीप आडनाईक | Updated: July 12, 2025 11:45 IST

मुख्यमंत्र्यांनी आश्वासन जरी दिले असले तरी ९०० विद्यार्थी अजूनही पूर्ण निधीच्या प्रतीक्षेत

संदीप आडनाईककोल्हापूर : बार्टी, सारथीच्या विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून अधिछात्रवृत्ती पूर्ण दिली, परंतु ‘महाज्योती’च्या विद्यार्थ्यांच्या नशिबी मात्र वनवासच आला आहे. निर्णयानुसार त्यांना केवळ ५ महिने ५ दिवसांचीच अधिछात्रवृत्ती अदा झाली परंतु नोंदणी दिनांकापासून हा निधी देण्यात सरकार गेल्या दोन वर्षांपासून टाळाटाळ करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन जरी दिले असले तरी ९०० विद्यार्थी अजूनही पूर्ण निधीच्या प्रतीक्षेत आहेत.बार्टी, सारथी आणि महाज्योती या संस्थांकडून राज्यातील अनुसूचित जाती, मराठा आणि ओबीसी, भटके विमुक्त या सामाजिक प्रवर्गातील संशोधक विद्यार्थ्यांना संशोधनासाठी अधिछात्रवृत्ती दिली जाते. यासाठी विद्यार्थ्यांनी दोन वर्षे सातत्याने आंदोलन करावे लागले. त्यानंतर समान धोरण जाहीर केले.२५ जुलै २०२४ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत ५० टक्के दराने या तिन्ही संस्थांच्या विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती देण्याचे जाहीर केले, पण दिले नाही. म्हणून विद्यार्थ्यांनी पूर्ण अधिछात्रवृत्तीसाठी पुन्हा तीव्र आंदोलन केले तेव्हा बार्टी आणि सारथीच्या विद्यार्थ्यांना पूर्ण आणि नोंदणी दिनांकापासून रक्कम दिली. त्यात महाज्योतीच्या १४५३ विद्यार्थ्यांनाही लाभ मिळणार होता परंतु अधिछात्रवृत्तीसाठी बराच कालावधी लागल्याने अनेक विद्यार्थ्यांनी कागदपत्रांची पडताळणी झाली नाही, त्यामुळे लाभधारकांची संख्या ९०० विद्यार्थ्यांपर्यंतच मर्यादित झाली.

वित्त विभागाकडून निधी नामंजूरगतवर्षीप्रमाणेच या अधिवेशनातही २०२३ च्या तुकडीतील विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासूनची छात्रवृत्ती देण्यासाठी पाठपुरावा केला पण निधीसाठी केलेली पुरवणी मागणी वित्त विभागाने नाकारली.आंदोलनानंतर आश्वासनमुंबईत ३ जुलैला गिरगाव चौपाटीवर शेकडो विद्यार्थ्यांनी जलसमाधी आंदोलन केले. त्याची दखल घेत इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी शिष्टमंडळाची भेट घेऊन या विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासूनची छात्रवृत्ती देण्याचे जाहीर केले. परंतु निधी नसल्याने मुख्यमंत्र्यांसमवेत आठवड्यात बैठक लावण्याचे आश्वासन दिले परंतु निधी मंजूर केला जात नसल्याने महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना पूर्ण लाभ देण्यात सरकार टाळाटाळ करत आहे.

आमच्यासोबत शिकणाऱ्या बार्टी आणि सारथीच्या विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून छात्रवृत्ती दिली परंतु महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना का दिलेली नाही. सरकारन त्यात भेदभाव कशासाठी करत आहे. शिष्टमंडळाला दिलेले आश्वासन पाळावे, बैठक लावावी. -सद्दाम मुजावर, संशोधक विद्यार्थी, महाज्याेती.