शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील खासगी अनुदानित शाळा ताब्यात घेण्याची सरकारची तयारी - मंत्री दीपक केसरकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 06:07 IST

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना वेतनेतर अनुदान देण्याबाबतच्या मागणीसाठी आमदार किरण सरनाईक, जयंत आसगावकर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

मुंबई : राज्यातील खासगी संस्थांच्या  प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या शिक्षकांच्या वेतनासाठी सरकार अनुदान देते. त्यामुळे जर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची मागणीही सरकारकडे करण्यात येत असेल तर खासगी अनुदानित शाळा ताब्यात घेऊन त्या चालविण्याची सरकारची तयारी आहे, असे विधान शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी केले.  

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना वेतनेतर अनुदान देण्याबाबतच्या मागणीसाठी आमदार किरण सरनाईक, जयंत आसगावकर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. याला उत्तर देताना मंत्री केसरकर म्हणाले, अनुदानित शाळांच्या शिक्षकांचे वेतन सरकार देते; पण शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतनही सरकार देणार असेल तर शाळाच आमच्या ताब्यात द्या.

शिक्षकांच्या वेतनावर ६६ हजार कोटी खर्च केले जातात. राजस्थान सरकार सर्व खासगी शाळा ताब्यात घेऊन चालवत आहे. त्याच धर्तीवर अनुदानित खासगी शाळा ताब्यात घेऊन राज्य सरकारनेच चालवाव्यात, असा विचार सुरू आहे. याविषयी मी माझ्या पातळीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना यासाठी तयार करेन, असा दावाही केसरकर यांनी यावेळी केला. 

...तर जमिनीचे, इमारतीचे पैसे द्या! : खडसेराष्ट्रवादीचे गटनेते एकनाथ खडसे  म्हणाले, खासगी शाळा सरकार ताब्यात घेत असतील तर स्वागतच आहे; पण शाळा ज्या जागेवर आहेत त्या जमिनीचे, मालमत्तेचे पैसे सरकारने द्यावेत. यावर केसरकर यांनी अनुदानित शाळा लोकवर्गणी आणि सरकारने दिलेल्या जमिनीवर उभ्या राहिल्याचे सांगितले.

शाळा म्हणजे कुणाची जहागिरी नाही : नीलम गोऱ्हे   केसरकर यांनी केलेली घोषणा ऐतिहासिक आहे; पण शाळा म्हणजे कुणाची जहागिरी नाही. उचलली आणि कुणाला दिली. त्यामुळे मंत्र्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत तसेच शिक्षण संस्था चालकांशी साधकबाधक चर्चा करूनच यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी सूचना उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केली.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर