शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत शासनाचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 03:12 IST

मराठा समाजाच्या मागण्यांबाबत राज्य शासन उदासीन आहे, यावर जळगावात झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत एकमत झाले.

जळगाव : मराठा समाजाच्या मागण्यांबाबत राज्य शासन उदासीन आहे, यावर जळगावात झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत एकमत झाले. उदासीनतेबाबत राज्य शासनाचा निषेध करण्यात आला व मागण्यांबाबत दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.जळगावातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात रविवारी ही बैठक झाली. या वेळी राज्यातील सर्व जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत या चर्चेची माहिती देण्यात आली. या वेळी प्रा. डी. डी. बच्छाव, विनोद देशमुख, मनोज पाटील, रमेश पाटील, अनिल पाटील आदी उपस्थित होते. समाजाच्या मागण्यांबाबत पाठपुरावा करण्यास राज्यस्तरीय समन्वय समित्यांचीही निवड करण्यात आली.बैैठकीत ८ ठराव मंजूर१) मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या वसतीगृहासाठी प्रती विद्यार्थी ग्रामीण भागासाठी २० हजार तर शहरी भागात २५ हजार अनुदान मिळावे. २) मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी गरजेनुसार विविध ठिकाणी जिल्ह्यात वसतीगृह बांधणीबाबतची माहिती त्वरित सादर करावी. जागा व इमारत विद्यार्थ्यांसाठीच उपयोगात येईल, अशी तरतूद करावी. ३) अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी नोडल आधिकारी नियुक्त करताना तो अधिकारी मराठा असावा. ४) अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या गैरवापराबाबत काहीही ठोस कार्यवाही न केल्यामुळे ही सभा सरकारचा निषेध करीत आहे. ५) अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या संदर्भात कायदेशीर लढाईसाठी जिल्हास्तरीय कायदेशीर समिती गठीत करण्यात यावी. ६) शासन ६२५ शैक्षणिक कोर्सेसबाबत मराठा समाजाची फसवणूक करीत असल्याने शासनाचा निषेध. (प्रवेश व सवलती मिळत नाही, शुल्कही प्रचंड), ७) छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह सर्व राष्ट्रीय महामानवांचा अवमान करणा-यांवर देशद्रोहाचे गुन्हे नोंदवावे. ८) जगभरात १९ फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करावी. (अन्य तारखेस साजरी करणा-यास तीव्र विरोध करणार).

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाJalgaonजळगाव