शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मराठा-ओबीसी वाद लावण्याचा सरकारचा प्रयत्न, मनोज जरांगे पाटील यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 16:49 IST

महायुती सरकारमुळे मोदींना डाग..

फलटण : सगळे मराठे मुंबईमध्ये येणार आहेत. यावेळी आपण ‘एक घर एक गाडी’ असा नारा दिला आहे. त्यामुळे तमाम मराठा समाजाला आव्हान आहे की, यावेळी कोणीही घरी थांबू नये. ही अस्तित्वाची व अंतिम लढाई आहे. कोणत्याही परिस्थितीत समाज हरता कामा नये, मराठ्यांचे हसू होईल, असे एकही मराठ्याने आता वागू नये, राजकारण बाजूला ठेवूऊन मराठ्यांनी एकत्र येणे गरजेचं आहे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केले. तसेच, राज्यातील सरकार मराठा आणि ओबीसी यांचा वाद लावण्याचा प्रयत्न करीत आहे, त्यापासून सावध रहावे, असेही पाटील म्हणाले.पश्चिम महाराष्ट्रातील मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकारी व समन्वयकांची बैठक फलटण येथील सजाई गार्डन येथे शुक्रवारी झाली. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, मराठा समाज शांततेत आपली मागणी मांडतो. शांततेत मुंबईला जातो, शांततेत येतो, याचा गैरफायदा सरकार उचलत आहे. यावेळी ताकतीने मुंबईला एकत्र येणे गरजेचे आहे. सरकारला दंगली घडवायच्या आहेत. पण आम्ही मराठी व ओबीसीत वाद होऊ देणार नाही.महायुती सरकारमुळे मोदींना डाग..राज्यातील महायुतीच्या सरकारच्या वागण्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार देखील अडचणीत येणार आहे. ते ओबीसीची बैठक गोव्यात घेत आहेत, त्यांचा वापर ते मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात करीत आहेत. मराठ्यांनी आता बेसावध राहू नका. कुठेही दंगल होणार नाही, याची काळजी सर्वांनी घ्यावी. ओबीसींच्या अंगावर जाऊ नका, असे आवाहनही जरांगे यांनी केले.