शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

हे सरकार फार काळ टिकणार नाही - फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 03:57 IST

जनादेशाच्या पाठित खंजीर खुपसणारे हे सरकार फार काळ चालणार नाही. देशाचा इतिहास हेच सांगतो, असे प्रतिपादन विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.

नागपूर : केवळ सत्तेचा माल खाण्यासाठी आणि भाजपला दूर ठेवण्यासाठी विश्वासघात आणि बेईमानी करून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. जनादेशाच्या पाठित खंजीर खुपसणारे हे सरकार फार काळ चालणार नाही. देशाचा इतिहास हेच सांगतो, असे प्रतिपादन विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. नागपूर जिल्ह्यातील आमडी फाटा आणि धानला येथे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.फडणवीस म्हणाले, निवडणूक काळामध्ये अवकाळीग्रस्तांना २५ हजार रुपये हेक्टरी मदत देण्यात यावी, अशी मागणी शिवसेना करीत होती तर ५० हजार रुपये हेक्टरी मदतीची मागणी काँग्रेस-राष्ट्रवादी करीत होती. पण आता शेतकऱ्यांना कोणतीही मदत देण्यास सपशेल नकार हे सरकार देत आहे. राज्यात आपण काळजीवाहू मुख्यमंत्री असताना १० हजार कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी मंजूर केले होते. आज शेतकºयांची मोठी फसवणूक होते आहे. गुरुवारी पुन्हा नागपूर आणि परिसरात गारपीट झाली आहे. त्यांनाही मदत दिली पाहिजे. एकिकडे अवकाळीग्रस्तांना मदत मिळत नसताना दुसरीकडे फसव्या जाहिरातीसारखी कर्जमाफी दिली जात आहे. आमच्या काळात २००१ ते २०१७ पासूनचे कर्ज माफ केले गेले. यांच्या सरकारने केवळ दोन वर्र्षांचे कर्ज माफ केले. सप्टेंबर २०१९ ची अट टाकून अवकाळीग्रस्तांना मदतीपासून वंचित ठेवले आणि त्यातही अटी-शर्ती लागू असे सांगून जीआर काढला. ही सरकारने केलेली मोठी लबाडी आहे.एकीकडे राज्यात मलाईदार खात्यांसाठी भांडाभांडी होत असताना कृषी शेती खाते कुणाकडे जावे, यासाठी मात्र कुणीही आग्रही दिसून येत नाही. यातूनच त्यांचे शेतकरी प्रेम दिसून येते. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने अनेक योजना आणल्या आणि आज त्याचा देशाला लाभ होत आहे, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस