शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

OBC Reservation Empirical Data: ओबीसी डेटावरून सरकार-आयोगामध्ये जुंपली; राज्य शासनानं बदलली आयोगाची कार्यकक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2022 09:15 IST

इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी) राजकीय मागासलेपण सिद्ध करणारा अंतरिम अहवाल राज्य मागासवर्ग आयोगाने द्यावा, असा दबाव राज्य शासनाकडून आणला गेल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.

- यदु जोशीमुंबई : इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी) राजकीय मागासलेपण सिद्ध करणारा अंतरिम अहवाल राज्य मागासवर्ग आयोगाने द्यावा, असा दबाव राज्य शासनाकडून आणला गेल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. तथापि, आयोगाने त्यास स्पष्टपणे नकार देण्याची भूमिका घेतली आहे. आयोगाची कार्यकक्षादेखील राज्य शासनाने बदलली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर स्थगित झाले होते. ते पुन्हा बहाल करायचे, तर इम्पिरिकल डेटा तयार करून त्याआधारे ५० टक्क्यांच्या मर्यादेत आरक्षण देता येईल, असा निकाल कोर्टाने दिल्याच्या पार्श्वभूमीवर शासनाने आयोग नेमून डेटा तयार करण्याचे काम आयोगाला दिले आहे.अध्यक्ष निरगुडे म्हणतात...आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला. आयोगामार्फत अधिकृतपणे दिल्या जाणाऱ्या प्रसिद्धिपत्रकात आयोगाची भूमिका स्पष्ट केली जाते. माध्यमांशी परस्पर कोणीही बोलू नये, असा निर्णय आयोगाने घेतला आहे आणि अध्यक्ष म्हणून तो मलादेखील लागू आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.आयोगाच्या बैठकीत जोरदार विरोधआयोगाचे अध्यक्ष निरगुडे यांनी आयोगाच्या पुणे येथे  गुरूवारी झालेल्या बैठकीत हा विषय मांडला. सर्व सदस्यांनी असा अंतरिम अहवाल देण्यास तीव्र विरोध दर्शविला. अंतरिम अहवाल देण्यासाठी आवश्यक माहिती आयोगाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे अंतरिम अहवाल द्यायचा तरी कोणत्या आधारे? शासन काही आकडेवारी पुरविणार असेल आणि त्याआधारे अंतरिम अहवाल देण्यास सांगितले जाणार असेल तर ते योग्य होणार नाही, अशी स्पष्ट भूमिका सदस्यांनी घेतली. अंतरिम अहवाल देता येणार नाही, अशी अधिकृत भूमिका आयोगातर्फे लवकरच शासनास कळविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.  कार्यकक्षेत गेल्याच आठवड्यात बदलजून २०२१ मध्ये शासन निर्णयाद्वारे निश्चित कार्यकक्षेत राज्य शासनाने मागणी केल्यास मागासवर्ग आयोग अंतरिम अहवाल सादर करेल व नंतर इम्पिरिकल डाटाच्या आधारे अंतिम अहवाल सादर करेल’ असा बदल गेल्याच आठवड्यात केला. त्याआधारे आयोगाकडे अंतरिम अहवालाची मागणी केली. त्यासाठी आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे यांच्याशी शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चर्चा केली व अंतरिम अहवाल लवकर द्यावा, असे सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. आरक्षणाबाबत पुढील सुनावणी १७ जानेवारीला होणार असून त्याआधी अंतरिम अहवाल सादर करत आगामी निवडणुकांतील ओबीसी आरक्षण वाचविण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षण