शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

सरकारवर फसवणुकीची गुन्हा दाखल व्हावा; नाना पटोले यांची पुन्हा सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2017 19:09 IST

भाजपाचे खासदार नाना पटोले यांनी पुन्हा एकदा सरकारला घरचा आहेर दिला आहे.

ठळक मुद्देभाजपाचे खासदार नाना पटोले यांनी पुन्हा एकदा सरकारला घरचा आहेर दिला आहे. सरकारवर फसवणुकीचा गुन्हा दाखल व्हावा, अशी थेट टीका त्यांनी केली आहे. ऐतिहासिक कर्जमाफीची रक्कम खात्यात केव्हा जमा होते. याची शेतकरी वाट बघतोय.

नागपूर - भाजपाचे खासदार नाना पटोले यांनी पुन्हा एकदा सरकारला घरचा आहेर दिला आहे. यावेळी सरकारवर फसवणुकीचा गुन्हा दाखल व्हावा, अशी थेट टीका त्यांनी केली आहे. ऐतिहासिक कर्जमाफीची रक्कम खात्यात केव्हा जमा होते. याची शेतकरी वाट बघतोय.  राज्यातील कोणत्याही तलावात बारमाही पाणी राहात नाही. तरीही वर्षभराची लीज वसूल करून मच्छिमारांची फसवणूक सुरू आहे.  शेतकरी व मच्छिमारांची फसवणूक करणाऱ्या राज्य सरकारच्या विरोधात ४२० कलमाखाली फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. शेतकरी व मच्छिमारांच्या बाजुने निर्णय झाला नाही, तर रस्त्यावर लढाई करू असा इशारा खासदार नाना पटोले यांनी शनिवारी दिला.

कोणत्याही राजकीय पक्षाचे बॅनर न लावता मासेमार -शेतकरी संघर्ष अभियान राबविण्याची घोषणा पटोले यांनी केली आहे.  या पार्श्वभूमिवर बजाजनगर येथे मच्छिमारांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी जय जवान, जय किसान  संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार, मच्छिमार संघाचे प्रदेश अध्यक्ष अशोक बर्वे, विदर्भ मच्छिमार संघाचे अध्यक्ष प्रकाश लोणारे, प्रफुल्ल पाटील, माजी न्यायाधीश चंद्रलाल मेश्राम, मनू दत्ता, देविदास चवरे, रामदास पडवळ आदी व्यासपीठावर उपस्थित होते. 

३०जून २०१७ रोजी राज्य सरकारने काढलेला  जीआर मच्छिमारांना वेठबिगार बनविणारा आहे. सामान्य माणसाची व्यथा मुख्यमंत्र्यांपुढे मांडली. हे सरकारचे पाप असल्याचे त्यांनी मान्य केले. यावर त्यांनी दोन सदस्यीय समिती गठीत करण्याची घोषणा त्यांनी केली. राज्यात २५ कोटी वीज ग्राहक आहेत. दररोज वीज शुल्कात वाढ सुरू आहे. एक-दोन रुपये वाढ असली तरी ही रक्कम मोठी होते. एकीकडे रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी कौशल्य विकासाच्या नावाखाली कोट्यवधींचा खर्च केला जात आहे. दुसरीकडे मच्छिमारांना बेरोजगार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.   तलावाला बारमाही पाणी असेल तरच  लीज देऊ  अन्यथा मच्छिमार लीज देणार नाही. अशी भूमिका पटोले यांनी मांडली. राजकारण हा आमचा धंदा नाही. पण  शेतकऱ्यांच्या पोटाची काळजी आहे.  शेतकरी सरकारला भीक मागत नाही. आपला हक्क मागत आहे. शेतकरी व मच्छिमारांना न्याय मिळावा. यासाठी संघर्ष अभियानाला सुरूवात करण्याची घोषणा पटोले यांनी केली. 

गोसेखूर्द संघावर नागपूरच्या नेत्याचा कब्जागोसेखूर्द प्रकल्पातील मासेमारीचे कंत्राट स्थानिक मच्छिमारांना मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु गोसेखूर्द मच्छिमार संघावर नागपूरच्या एका नेत्याने कब्जा मिळविला आहे. मच्छिमाराऐवजी राजकीय नेते आता मच्छिमार संघ चालवायला निघाले आहे. हा मच्छिमारांचा विश्वासघात असल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे.