शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या योजना फक्त जाहिरातींपुरत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 06:37 IST

धनंजय मुंडे : दुष्काळी उपाययोजनांत सरकार अपयशी

मुंबई : दुष्काळ हाताळण्यात सरकार अपयशी ठरले आहे. कदाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा अभ्यास कमी पडला असेल, अशी उपरोधिक टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बुधवारी विधान परिषदेत केली. राज्यातील दुष्काळी स्थिती पाहता विनाअट सरसकट शेतकरी कर्जमाफी, आर्थिक मदत, वीजबिल माफ करावे आणि दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून केंद्राने राज्याला ३० हजार कोटींची मदत करण्याची मागणी त्यांनी केली.

केंद्राची २०१६ ची दुष्काळ संहिता राज्याच्या हिताची नव्हती तरीही राज्य सरकारने स्वीकारली. सरकारने १५१ तालुके दुष्काळग्रस्त असल्याचे जाहीर झाले. मात्र, केंद्राच्या संहितेप्रमाणे आता केंद्रीय पथक येऊन निरीक्षण करेल. त्यानंतर या तालुक्यांचा दुष्काळ कायम ठेवायचा की नाही याबाबत निर्णय होईल. त्यामुळे सरकार दुष्काळाबाबत जनतेची दिशाभूल करत आहे. बोंडअळीबाबत राज्य सरकारने केंद्राकडे मदतीसाठी ३३०० कोटी रुपये मागितले. प्रत्यक्षात राज्य सरकारला केंद्राने एक छदामही दिला तर नाहीच, शिवाय साधे पाहणी पथक राज्य सरकार महाराष्ट्रात आणू शकले नाही. यावरून या सरकारची केंद्रात किती पत आहे हे सगळ्यांना कळले, असे मुंडे म्हणाले.सरकारने आजवर जाहीर केलेल्या योजना फक्त जाहिरातींपुरत्या मर्यादित राहिल्या. सन २०१६-१७ मध्ये शेतकऱ्यांनी पीक विम्या पोटी ४००० कोटींचा हप्ता भरला. मात्र त्यांना केवळ १९०० कोटी दिले. एका वर्षात विमा कंपन्यांना सरकारने दोन हजार कोटींपेक्षा जास्त फायदा मिळवून दिला, असा आरोपही मुंडे यांनी केला....तर डीजे लावून सत्कार करेन!राज्यातील लाखो दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित असताना, भाजपा-शिवसेनेचे सरकार दुष्काळी उपाययोजना सुरू असल्याचे ढोल बडवते आहे. हे वस्तुस्थितीचे भान नसलेले बेभान सरकार आहे. सरकारने शेतकºयांना सुखी करावे, मग मीच सरकारचा डीजे लावून सत्कार करेन, अशी उपहासात्मक टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.जलयुक्त शिवारमध्ये राज्यात १६ हजार गावे दुष्काळमुक्त झाली असून, इतर ९ हजार गावे दुष्काळमुक्त होण्याच्या मार्गावर असल्याचे देशाच्या पंतप्रधानांनी गेल्या महिन्यात शिर्डीत जाहीर केले होते. तरीही त्याच गावांमध्ये दुष्काळ का पडला, असा प्रश्न करून पंतप्रधानांनी दुष्काळमुक्त जाहीर केलेली एकूण महाराष्ट्रातील २५ हजार गावांची यादी जाहीर करावी, असे आव्हान विखे पाटील यांनी सरकारला दिले.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडे