शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

निवडणूक वर्षात सरकारला आठवले ‘गांधीमहात्म्य’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 06:42 IST

वर्षभर भरगच्च कार्यक्रम; गांधीविचारांचा प्रचार आणि प्रसार करणार

- यदु जोशीमुंबई : काही महिन्यांत येऊ घातलेली लोकसभा निवडणूक आणि सहा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील भाजपाप्रणित देवेंद्र फडणवीस सरकारला राष्ट्रीय पिता महात्मा गांधी यांची आठवण झाली आहे. गांधीजींच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधत ‘गांधी महात्म्या’ची पारायणं करण्याचा ‘भरगच्च कार्यक्रम’ सरकारने आखला आहे.गांधीविचार आणि सर्वोदयींना राष्ट्रीय स्वंयसेवक संघ परिवाराने ‘आपलं’ मानलंच नाही, आजवर कधीच संघशाखेत गांधी जयंती साजरी झाली नाही, असे आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर होत आले आहेत. गांधीहत्येचं पातकही संघाच्या माथी मारण्याचा प्रयत्न झाला. मात्र, केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून ‘स्वच्छता अभियाना’च्या माध्यमातून गांधींना आपलंस करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अमेरिका, चीन आणि जपानच्या राष्टÑप्रमुखांना साबरमती आश्रमाची भेट घडवून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परदेशी पाहुण्यांना सूतकताईचे महत्व पटवून दिले.येत्या २आॅक्टोबर रोजी गाधींजींची १५० वी जयंती आहे. या जयंतीचे औचित्य साधून २ आॅक्टोबरपासून केंद्र आणि राज्य सरकार वर्षभर भरगच्च कार्यक्रम आणि उपक्रम राबविणार आहे. केंद्र सरकारने पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सदस्य आहेत. राज्य सरकारने देखील वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोजन समिती स्थापन केलीजाणार असून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे समितीच्या सहअध्यक्ष असतील. ही समिती कार्यक्रमाची रुपरेषा निश्चित करेल. त्यांची अंमलबजावणी आणि देखरेख यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती असेल.येत्या २ आॅक्टोबरपासून राज्यात ठिकठिकाणी असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्यांच्या अवतीभोवती सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. सेवाग्राम विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल. विविध शहरे, गावांमध्ये असलेल्या महात्मा गांधी मार्गांवर ग्रामोद्योगातून स्वयंरोजगार या विषयांवर आठवड्यातून दोन दिवस प्रदर्शने भरविण्यात येतील.

राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये रोजगारनिर्मितीला प्रोत्साहन, विपणन व व्यवसाय विकास, खादीचे महत्त्व या विषयांवर परिसंवाद होतील. खादी आणि ग्रामोद्योगातील वस्तूंच्या विक्रीसाठी विभागीय पातळीवर महाखादी प्रोत्साहन व विक्री डेपो उभारण्यात येतील. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सौरऊर्जा चरख्यांचे वाटप केले जाईल. त्यासाठी सरकारने आठ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.असे असतील ‘सर्वोदयी’ उपक्रम‘एक विद्यार्थी, एक शिक्षक’या योजनेंतर्गत एक शिक्षक अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यास दत्तक घेतील. शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना गांधीजींचे कार्य आणि त्यांचे विचार या बाबत मार्गदर्शन केले जाईल.गांधीजींचे वास्तव्य राहिलेले मुंबईतील मणिभवन, आगा खान पॅलेस आणि पुण्यातील येरवडा कारागृहात विशेष सुविधा पुरविण्यात येतील.‘गांधी फॉर टुमारो’ अंतर्गत महात्मा गांधी मानव संसाधन आणि प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येईल.‘महात्मा गांधी १५०’ असे मोबाइल अ‍ॅप तयार करून त्याच्या माध्यमातून गांधीविचारांचा प्रसार करण्यात येणार आहे.150 व्या जयंतीनिमित्त येत्या २ आॅक्टोबरपासून राज्यात ठिकठिकाणी असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्यांच्या अवतीभोवती सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीBJPभाजपा