शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

राेहा येथे उभारणार सरकारी औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2021 04:25 IST

उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत; प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

रायगड :  जिल्ह्यात सरकारी औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय पदविका आणि पदवी अभ्यासक्रमासह सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील राेहा तालुक्यात सरकारी औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालय सुरू करण्याबाबतचे पहिले पाऊल पडल्याचे बाेलले जाते. या महाविद्यालयामुळे काेकणातील तरुणांना याचा सर्वाधिक फायदा हाेणार आहे. सामंत यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  तंत्र शिक्षण संचालनालयामार्फत समिती गठीत करुन या नियोजित महाविद्यालयाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करावा, अशीही त्यांनी सूचना केली.रोहा तालुक्यातील कोलाड येथे सरकारी औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय उभारण्यासाठी सुमारे ५ एकर सरकारी जमीन उपलब्ध आहे. त्यानुसार रायगडच्या जिल्हाधिकारी यांच्यामार्फत जमीन प्रदान करण्याबाबत पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. लवकरच प्रकल्प समितीमार्फत या जागेची पाहणी करण्यात येणार आहे.  कोकण विभागामध्ये समाविष्ट असलेल्या प्रदेशाकरिता भौगोलिकदृष्ट्या रायगड जिल्हा हा मध्यवर्ती जिल्हा आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक , मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग, यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा जलमार्ग यांच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये दळणवळणाचे व्यापक जाळे निर्माण झाले आहे. याप्रसंगी पालकमंत्री आदिती तटकरे उपस्थित होत्या. तसेच तंत्र शिक्षण संचालक डॉ. अभय वाघ हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.शैक्षणिक संकुले झाली विकसितरायगड जिल्ह्यामध्ये औद्योगिकीकरण, नागरीकरण, पर्यटन आदी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत आहे. तसेच जिल्ह्यामध्ये विविध शैक्षणिक संस्थामार्फत अनेक शैक्षणिक संकुले विकसित झाली आहेत. त्यामध्ये कला, वाणिज्य, शास्त्र, वैद्यकीय, अभियांत्रिकी यांच्यासह अन्य तत्सम शाखांच्या महाविद्यालयांचा आणि विद्यापीठांचा समावेश आहे.  

टॅग्स :Uday Samantउदय सामंत