शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

शासकीय कार्यालये होईनात ‘कॅशलेस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2017 02:11 IST

कॅशलेस व्यवहारांवर नागरिकांनी भर देण्याचे आवाहन केले जाते, बक्षिसे दिली जातात.

पिंपरी : कॅशलेस व्यवहारांवर नागरिकांनी भर देण्याचे आवाहन केले जाते, बक्षिसे दिली जातात. दुसऱ्या बाजुला मात्र शहरातील अनेक शासकीय कार्यालयांत स्वाइप मशिन उपलब्ध नसल्याने कॅशलेस व्यवहार कसे होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.नागरिकांकडे एटीएम, डेबिट कार्ड उपलब्ध असताना संबंधित कार्यालयात यंत्रणाच उपलब्ध नसल्याने नागरिकांपुढेही रोखीने व्यवहार करण्याशिवाय गत्यंतर नसल्याचे लोकमतने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये समोर आले आहे. केंद्र शासनाने पाचशे, हजारच्या जुन्या नोटा रद्द करण्याचा निर्णय ८ नोव्हेंबरला घेण्यात आला. त्यानंतर सर्व व्यवहार कॅशलेस व्हावेत, यासाठी सरकार आवाहन करीत आहे. मात्र, अद्यापही पिंपरी-चिंचवड शहरातील शासकीय कार्यालयांसह महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये स्वाइप मशिन उपलब्ध नसल्याने रोखीनेच व्यवहार सुरू आहेत. नागरिकांकडे एटीएम, डेबिट कार्ड असतानाही त्यांचा उपयोग होत नाही. यामुळे नागरिकांना अडचणींचा व गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. रोख रकमेसाठी रांगा कायम...पाचशे, हजारच्या जुन्या नोटा बंद केल्यानंतर एटीएमवर रांगा लागत आहेत. त्या अद्यापही कमी झालेल्या नाहीत. बँक व एटीएममधून रोख रक्कम मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी अनेकांकडून एटीएम, डेबिट कार्डचा वापर केला जातो. मात्र, एखाद्या कार्यालयात स्वाइप मशिनच उपलब्ध नसल्यास संबंधित व्यक्तीला गैरसोयीचा सामना करावा लागतो. >परिवहन कार्यालय अशाच प्रकारची स्थिती चिखलीतील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात पाहायला मिळाली. या ठिकाणी विविध कर भरण्यासाठी स्वतंत्र खिडक्यांची व्यवस्था आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रकमेचा भरणा होत असतो. मात्र, तेथेही स्वाइप मशिनअभावी रोख रक्कमच द्यावी लागते. अशावेळी एखादा व्यक्ती रक्कम जमा करण्यासाठी कार्ड घेऊन आला, तरी त्याचा उपयोग होत नाही. मशिनच उपलब्ध नसल्याने रोख रक्कमच जमा करावी लागते. >वायसीएम रुग्णालयात रुग्णांची गैरसोयमहापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात बिल भरण्यासाठी स्वाइप मशिन उपलब्ध नाहीत. त्यामुळे कार्ड स्वीकारण्यास नकार दिल्यास रुग्णांच्या नातेवाइकांची तारांबळ उडते. यामुळे या ठिकाणी स्वाइप मशिन उपलब्ध व्हावी, अशी मागणी होत आहे. या रुग्णालयात शहरासह आजूबाजूच्या तालुक्यातीलही रुग्ण दाखल होत असतात. एटीएम मशिनद्वारे पुरेशी रक्कम उपलब्ध न झाल्यास बिल भरताना एटीएम व डेबीट कार्डद्वारे पैसे जमा करून घेण्याबाबत विचारणा केली असता संबंधित प्रशासनाकडून नकार दिला जातो. >कार्ड असूनही नसल्यासारखेपाचशे, हजारच्या जुन्या नोटा चलनातून बंद झाल्यानंतर रोख रकमेची कमतरता भासू लागली. यामुळे नागरिकांनीदेखील कॅशलेस व्यवहारावर भर दिला. एटीएम, डेबिट कार्डचा वापर करीत व्यवहार सुरू ठेवले. मात्र, एखाद्या ठिकाणी कार्डच स्वीकारले जात नसल्याने नागरिकांची तारांबळ होत असून, रोखीनेच व्यवहार करण्याची वेळ येत आहे. त्यामुळे खिशात एटीएम, डेबिट कार्ड असूनही उपयोेग नाही अशी स्थिती आहे.