शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कार्यालयांनाही २ टक्के टीडीएस वजावट बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 21:40 IST

अंमलबजावणी १ ऑक्टोबरपासून : पुरवठादाराला ५ दिवसांत ऑनलाईन टीडीएस प्रमाणपत्र देणे अनिवार्य - निवृत्त राज्य वस्तू व सेवाकर उपायुक्त गवंडी यांची माहिती

लातूर : केंद्र व राज्य शासनाचे सर्व कार्यालये, स्थानिक प्राधिकरण, शासकीय अभिकरण (एजन्सी) शासनाच्या सहभागातून चालणारी मंडळे व सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम या सर्वांनाच १ ऑक्टोबर २०१८ पासून २ टक्के टीडीएस वजावट करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच संबंधित यंत्रणेला सेवा किंवा वस्तू पुरवठा करणाºयास पाच दिवसांच्या आत ऑनलाईन टीडीएस प्रमाणपत्र देणेही अनिवार्य करण्यात आले आहे. 

वस्तू व सेवाकर कायदा २०१७ चे कलम ५१ व त्यासंदर्भाने १३ सप्टेंबर २०१८ रोजी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार झालेल्या बदलांबाबतची माहिती राज्य वस्तू व सेवाकर विभागाचे उपायुक्त गंगाधर गवंडी यांनी दिली आहे. त्यांनी म्हटले आहे, शासकीय कार्यालये, आस्थापना मंडळे, शासकीय संस्था व सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असलेल्या संस्थांनी कोणत्याही पुरवठादाराकडून वस्तू अथवा सेवा खरेदी केली तर कराची वजावट (टीडीएस) करण्याची तरतूद आहे. केंद्राच्या वित्त विभागाने १३ सप्टेंबर रोजी नव्याने अधिसूचना जारी केली. त्याची अंमलबजावणी १ ऑक्टोबरपासून करावी लागणार आहे. 

उपरोक्त संस्थांना कोणत्याही पुरवठादाराने अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेची सेवा अथवा वस्तू पुरविली, तर त्यांना रक्कम देताना टीडीएस वजावट करावी लागेल. उदा. महापालिकेने ३ लाखांची खरेदी केली, तर पुरवठादार ३ लाख तसेच त्यावर सीजीएसटी व एसजीएसटी मिळून १५ हजार असे एकूण ३ लाख १५ हजार रुपयांचे बिल देईल. परंतु, संबंधित पुरवठादाराला बिल अदा करताना मूळ ३ लाख रुपये रकमेवर एकूण २ टक्के टीडीएस म्हणजेच ६ हजार रुपये वजा करावे लागतील. ज्यामुळे प्रत्यक्ष पुरवठादाराला ३ लाख ९ हजार रुपये मिळतील. हा नियम सर्व शासकीय संस्थांना लागू आहे. त्याची संबंधित लेखा विभागाला काळजी घ्यावी लागणार आहे, अशी माहिती गवंडी यांनी दिली. 

टीडीएस १० तारखेच्या आत भरा...टीडीएस वजावट केलेली रक्कम १० तारखेच्या आत शासनाच्या तिजोरीत ऑनलाईन चलनाद्वारे जमा नाही केली, तर उशिरा जमा केलेल्या रकमेवर कलम ५० (१) अन्वये १८ टक्के प्रमाणे व्याज आकारण्याची तरतूद आहे. तसेच ऑनलाईन टीडीएस प्रमाणपत्र पाच दिवसांच्या आत देणेही अनिवार्य केले असून, उशीर झाल्यास प्रत्येक दिवसासाठी १०० रुपये, जास्तीत जास्त ५ हजार रुपये एवढे विलंब शुल्क शासकीय तिजोरीत भरावे लागणार आहेत, हा बदलही गवंडी यांनी लक्षात आणून दिला.

टॅग्स :TaxकरGovernmentसरकार