शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

चला दप्तर भरा, सरकार शाळा सुरू करण्याच्या विचारात..! आज निर्णय होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 07:29 IST

राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारी होणाऱ्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

मुंबई : राज्यातील पूर्वप्राथामिक शाळा येत्या सोमवारपासून पुन्हा सुरू कराव्यात असा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बुधवारी दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारी होणाऱ्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.कोरोनाची तिसरी लाट आल्यानंतर शाळा १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. तथापि, आता रुग्णसंख्या आणि प्रादुर्भाव घटत असल्याने शाळा सुरू करण्याची मागणी पालकांनी आणि विविध संघटनांनी केली आहे. मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत आढावा घेऊन या बाबत निर्णय केला जाईल, असे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तीन दिवसांपूर्वीच स्पष्ट केले होते. त्यातच राज्य सरकारच्या चाईल्ड टास्क फोर्सनेही शाळा सुरू करण्याबाबत सकारात्मक मत दिले आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत शाळा सुरू करण्याचा निर्णय होण्याचे स्पष्ट संकेत आहेत.पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करावेत, असे शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावात म्हटले आहे. आतापर्यंत पूर्व प्राथमिकचे वर्ग सुरू करण्यात आलेले नव्हते. सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेणे अनिवार्य असावे आणि विद्यार्थ्यांसाठी शाळांमध्ये लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्यास अनुमती असावी, असेही शिक्षण विभागाच्या प्रस्तावात म्हटले आहे. शाळा पुन्हा सुरू करताना नव्याने त्या बाबतची नियमावली राज्य सरकारकडून जारी केली जाण्याचीही शक्यता आहे.नव्याने नियमावली जारी करणार?पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करावेत, असे शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावात म्हटले आहे. आतापर्यंत पूर्व प्राथमिकचे वर्ग सुरू करण्यात आलेले नव्हते. सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेणे अनिवार्य असावे आणि विद्यार्थ्यांसाठी शाळांमध्ये लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्यास अनुमती असावी, असेही शिक्षण विभागाच्या प्रस्तावात म्हटले आहे. शाळा पुन्हा सुरू करताना नव्याने त्या बाबतची नियमावली राज्य सरकारकडून जारी केली जाण्याचीही शक्यता आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या