शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Uddhav Thackeray: न्यायप्रविष्ट प्रकरणात सरकारचा हस्तक्षेप गंभीर विषय, थातूरमातूर उत्तर नको; उद्धव ठाकरे कडाडले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 18:07 IST

राज्याचे मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत नागपूर न्यास जमीन विक्री प्रकरणावरुन आज विरोधकांनी विधान परिषेदत शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी केली.

नागपूर-

राज्याचे मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत नागपूर न्यास जमीन विक्री प्रकरणावरुन आज विरोधकांनी विधान परिषेदत शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी केली. नागपूर न्यास प्रकरणावरुन विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. याच मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे यांनीही शिंदे सरकारला धारेवर धरलं आहे. नागपूर न्यास जमीन विक्री प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही सरकारकडून हस्तक्षेप केला गेला असं कोर्टाच्या अमायकस क्युरीनंच (न्यायालयाचे मित्र) म्हटलं आहे. न्यायप्रविष्ट प्रकरणामध्ये मंत्र्यानं हस्तक्षेप करणं हे प्रकरण अतिशय गंभीर आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

"नागपूर न्यास जमीन विक्री प्रकरणाची फडणवीसांनी ज्या सहजतेनं लिलया कथानक सभागृहात सांगितलं त्यानुसार जर विषय इतका सोपा होता तर तो इतके वर्ष का चालला? अमायकर क्युरी जर म्हणत असेल की सरकारचा हस्तक्षेप झाला होता तर मग याचा अर्थ काय? नुसतं ही एक केस म्हणून याकडे पाहणं चुकीचं आहे. विषय न्यायप्रविष्ट प्रकरणांमध्ये सरकारकडून केल्या गेलेल्या हस्तक्षेपाचा आहे", असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

मी त्यावेळी मुख्यमंत्री असलो तरी...नागपूर न्यास जमीन विक्री प्रकरणासंबंधीचा निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आला होता याबाबत बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिलं. "मी त्यावेळी मुख्यमंत्री असलो तरी घेण्यात आलेला निर्णय नगरविकास खात्याअंतर्गत तत्कालीन मंत्र्यांनी घेतला होता. नगरविकास खात्याच्या अखत्यारित तो निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळीचे नगरविकास मंत्री आताही त्याच खात्याचे मंत्री आणि मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी उत्तर देणं गरजेचं आहे. नुसतं थातूरमातूर उत्तर देऊन चालणार नाही. न्यायप्रविष्ट प्रकरणात तुम्ही हस्तक्षेप केलात हा मुद्दा आहे", असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

आमचा पक्ष पहिला, तुमचा दुसरा हा बालिशपणाराज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपाकडून सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा केला गेला आहे. त्यावरही उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला. "ग्रामपंयाचत निवडणुकीत स्थानिक पातळीवरची गणितं वेगळी असतात. स्थानिक पातळीवर विविध ठिकाणी विविध आघाड्या होत असतात. ग्रामपंचायत निवडणुकीत गावकऱ्यांचा विजय होत असतो. तिथं पक्षाचा काही थेट संबंध नसतो. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आमचा पक्ष पहिला, तुमचा दुसरा हे असं करणं म्हणजे बालिशपणा आहे", असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे