शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणपूरक विसर्जनाला हरताळ फासण्याची शासनाकडून गंभीर दखल, शिक्षण मंत्र्यांकडून चौकशीचे आदेश; कारणे दाखवा नोटीस बजावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2017 14:49 IST

महाविद्यालयांनी धार्मिक विधींमध्ये हस्तक्षेप करू नये, पर्यावरण पूरक गणेश विसर्जन उपक्रमात सहभागी होणाऱ्या विद्यार्थी यांची चौकशी करावी या उच्च शिक्षण पुणे विभागाच्या अधिका-यांनी काढलेल्या धक्कादायक आदेशाची गंभीर दखल

दीपक जाधवपुणे, दि. 10 - महाविद्यालयांनी धार्मिक विधींमध्ये हस्तक्षेप करू नये, पर्यावरण पूरक गणेश विसर्जन उपक्रमात सहभागी होणाऱ्या विद्यार्थी यांची चौकशी करावी या उच्च शिक्षण पुणे विभागाच्या अधिका-यांनी काढलेल्या धक्कादायक आदेशाची गंभीर दखल राज्य शासनाने घेतली आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार संबधित सहसंचालकांना नोटीस बजावण्यात आल्याचे उच्च शिक्षण विभागाचे संचालक धनराज माने यांनी "लोकमत"शी बोलताना सांगितले.पुणे विभागाचे सहसंचालक विजय नारखेडे यांनी महाविद्यालयाचे विद्यार्थीनी धार्मिक विधींमध्ये हस्तक्षेप करू नये तसेच ते पर्यावरण पूरक गणेशोत्सवात सहभागी होत असल्यास त्याची तपासणी करून कार्यवाही करावी असे निर्देश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठास दिले होते. त्यानुसार विद्यापीठाने लगेच त्याबाबतचे पत्र सर्व महाविद्यालयांना पाठविल्याचा धक्कादायक प्रकार लोकमतने शनिवारी उजेडात आणला. त्यानंतर त्याचे जोरदार पडसाद उमटण्यास सुरुवात झाली होती. शिक्षण मंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. शासनाचे कुठलेही निर्देश नसताना परस्पर तुम्ही असे आदेश कसे काढले याबाबतची कारणे दाखवा नोटीस सहसंचालक विजय नारखेडे यांना बजावण्यात आल्याचे धनराज माने यांनी सांगितले.हिंदू जनजागृती समितीने विजय नारखेडे यांना २८ ऑगस्ट रोजी एक पत्र दिले दिले होते. त्यामध्ये महाविद्यालयातील तरुण पर्यावरण पूरक गणेश विसर्जन करावे म्हणून लोकांवर दबाब टाकतात, त्यांना मनाई करावी अशी मागणी केली होती. त्या पत्रावर नारखेडे यांनी लगेच कृती करीत महाविद्यालयांनी या पत्रानुसार योग्य ती कार्यवाही करावी असे आदेश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला दिले होते.वस्तुतः अंनिसच्या पर्यावरण पूरक विसर्जन मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद देत तत्कालिन आघाडी सरकारने पर्यावरण पूरक विसर्जन कार्यक्रम महाविद्यालय पातळीवर स्वीकारला असताना उच्च शिक्षण विभागातील एखाद्या अधिकाऱ्याने परस्पर असे आदेश काढल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :PuneपुणेGaneshotsavगणेशोत्सव