शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

महिलादिनी महिलांना सरकारी भेट; महिला धोरण जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2024 08:19 IST

जागतिक महिला दिनी राज्याचे नवीन महिला धोरण जाहीर झाले आहे.

मुंबई : महिला दिनी राज्य सरकारने राज्यातील महिलांना गुड न्यूज दिली. महिलांना सक्षम बनवणारे राज्याचे चौथे महिला धोरण शुक्रवारी महिला दिनी लागू करण्यात आले. 

जागतिक महिला दिनी राज्याचे नवीन महिला धोरण जाहीर झाले आहे. महिलांना समान संधींसोबतच रोजगारात प्राधान्य, कामकाजी महिलांना गर्भवती असतानाच्या काळात विविध सुविधा अशा विविध उपाययोजना त्यात करण्यात आल्या आहेत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

काय आहे महिला धोरणात?- दुर्गम भागात मोफत आरोग्य तपासणी शिबिरी घेणे.- महिलांची संख्या जास्त असलेल्या कामाच्या ठिकाणी मागणीनुसार पाळणाघर उपलब्ध करणे,- मुलींची शाळांमधील नोंदणी १०० टक्के होईल व त्यात सातत्य टिकून राहील याची दक्षता घेणे.- सार्वजनिक व खाजगी कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंधासाठी समिती स्थापन करणे.- सर्व पोलीस मुख्यालयात भरोसा कक्ष स्थापन करणे.- महिलांना वापरण्यास अनुकूल कृषी यंत्रणे तयार करण्यासाठी उद्योगांना प्रोत्साहन देणे.- असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या आणि ऊसतोड महिलांसाठी वसतीगृहे स्थापण्याचा विचार.- नोकरी करणाऱ्या महिलांसाठी जिल्हा पातळीवर वसतीगृहे. निवडून आलेल्या महिलांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम.

कार्यक्रम का नाही?एवढ्या मोठ्या धोरणाच्या अधिकृत घोषणेचा कार्यक्रमच झाला नाही. या आठवड्यात होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत महिला धोरण जाहीर करून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते धोरणाच्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्याचे विभागाने ठरवले होते. मात्र ही बैठक होऊ शकली नाही. महिला दिन निघून गेल्यानंतर हे धोरण जाहीर करणे उचित ठरले नसते. त्यामुळे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आम्ही हे धोरण लागू केल्याचे महिला व बालकल्याण मंत्री  अदिती तटकरे यांनी सांगितले.  

टॅग्स :WomenमहिलाState Governmentराज्य सरकार