शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

सरकारने दिली 798 कोटींची टोल नुकसानभरपाई; ‘आरटीआय’अंतर्गत उघड झाली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 15:51 IST

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या अखत्यारीतील हे टोल नाके होते. 

मुंबई : बंद पडलेले १२ टोल नाके आणि जिथे छोट्या वाहनांना टोलमाफी दिली गेली होती असे ५३ टोल नाके या सगळ्यांसाठी संबंधित कंत्राटदारांना २०१६ मध्येच ७९८ कोटी रुपये नुकसान भरपाई दिली गेल्याचे माहिती अधिकारांतर्गत उघड झाले आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या अखत्यारीतील हे टोल नाके होते. 

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याबाबतची माहिती मागितली होती. त्यावर या विभागाचे अवर सचिव शैलेंद्र बोरसे यांनी द्याव्या लागलेल्या नुकसान भरपाईचा तपशील दिला.

टोलनाके आणि नुकसानभरपाई -    महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ : यांच्या अखत्यारीतील ५३ टोलनाक्यांपैकी एक टोलनाका बंद करण्यात आल्याने १६८ कोटी रुपये नुकसानभरपाई द्यावी लागली होती. १२ प्रकल्पांवरील २६ टोलनाक्यांवर कार, जीप तसेच एसटी आणि स्कूल बसना टोलमधून सूट दिल्यामुळे २०१५-१६ या वर्षात २२४ कोटी रुपये द्यावे लागले होते.

-     सार्वजनिक बांधकाम विभाग : यांच्या अखत्यारीतील ३८ टोलनाक्यांपैकी ११ टोल बंद केल्यामुळे २२६  कोटी रुपये परतावा द्यावा लागला होता. तसेच उर्वरित १९ प्रकल्पांवरील २७ टोलनाक्यांवर कार जीप तसेच एसटी आणि स्कूल बस यांना टोलमधून सूट दिल्याने २०१५-१६  या वर्षांत कंत्राटदारास १७९ कोटी रुपये द्यावे लागले होते. 

बंद टोलनाकेमहाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील ५३ टोलनाक्यांपैकी चंद्रपूर येथील रेल्वे ओव्हर ब्रिज तडाली (आरओबी) टोलनाका बंद झाला असून, त्यासाठी एकरकमी १६८ कोटी रुपये दिले गेले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडील ३८ पैकी ११ टोलनाके बंद केले गेले. त्यात अलिबाग-पेण-खोपोली, पुण्यातील मावळ येथील वडगाव-चाकण-शिक्रापूर प्रकल्पातील दोन नाके आणि  मोहोळ-कुरुळ-कामती-मंद्रुप, सोलापूर येथील टेंभुर्णी -कुर्डूवाडी-बार्शी लातूर वाडी, अहमदनगर करमाळा- टेंभुर्णी रस्ता, नाशिक-वणी रस्ता, भुसावळ येथील यावल फैजपूर रस्ता आणि खामगाव वळण रस्ता येथील टोल नाक्यांचा समावेश आहे.

टॅग्स :tollplazaटोलनाकाMumbaiमुंबईGovernmentसरकार