शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation: सरकारला मराठ्यांना आरक्षण द्यायचेच नाही; विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 16:49 IST

सरकारचा हेतूच शुद्ध नाही़ मराठा तसेच इतर समाजालाही यांना आरक्षण द्यायचे नाही, असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी आज येथे केला़

लोहारा (उस्मानाबाद) : मराठा आरक्षण देण्याची सरकारची इच्छाच नाही़ धनगर समाजाला पहिल्या मंत्रीमंडळ बैठकीत आरक्षण देऊ, असे सांगतिले होते़ मुस्लिम समाजाला उच्च न्यायालयानेही मंजूर केलेले ५ टक्के शैक्षणिक आरक्षण या सरकारमुळे गेले़ यांचा हेतूच शुद्ध नाही़ मराठा तसेच इतर समाजालाही यांना आरक्षण द्यायचे नाही, असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी आज येथे केला़

दुष्काळ पाहणी दौऱ्यानिमित्त विखे आज उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा दौऱ्यावर होते़ यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सरकारवर टीकेची झोड उठविली़ ते म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत प्रत्येक वेळी मागासवर्गीय आयोगाचा अहवाल येऊ द्या, असेच तुणतुणे सरकारने वाजवले़ आता अहवाल आला आहे़ पाहूया काय करतात ते़ मुळातच यांना कोणासही आरक्षण द्यायचे नाही, असा आरोप विखे यांनी केला़ जलयुक्त शिवारचे मुख्यमंत्री कौतुक करीत सुटले आहेत़ मात्र, हे जलयुक्त नव्हे ‘झोलयुक्त’ शिवार आहे़ या योजनेतून केवळ कंत्राटदारांची अन् त्यांच्यामागे असलेल्या पक्षाच्या बगलबच्च्यांची घरे भरली जात आहेत़ शेतकऱ्यांची सातत्याने फसवणूक सुरु आहे़ ३५ हजार कोटींची कर्जमाफी म्हणून गाजावाजा केला़ आतापर्यंत केवळ १६ हजार कोटींचीच कर्जमाफी झालीय़ दुष्काळ आॅगस्टमध्येच जाहीर करायला हवे होते़ जेणेकरुन आता निर्माण झालेल्या चारा-पाण्याच्या संकटावर उपाययोजना करता आली असती़ सध्या लोकांना फसवण्याचा एकमेव धंदा सरकारकडून सुरु असल्याचा आरोपही विखे यांनी केला़ खरीप पिक गेल्याने खरीपातील कर्ज माफ करावे व रबीची पेरणीच नसल्याने शेतकऱ्यांना पुढच्या आठ महिन्यांच्या उदरनिर्वाहासाठी ५० हजार रुपये हेक्टरी मदत करावी, अशी मागणीही विखे यांनी मांडली़

बैठका कसल्या घेता, खेड्यात फिरा...दुष्काळी उपाययोजना आखण्याची, निधी उभारण्याची जबाबदारी राज्य सरकारची असते़ मात्र, सरकार भिकेला लागले असेल, यांच्याकडे इतकी दानत नसेल, क्षमता नसेल तर सत्तेतून बाजूला व्हावे, असा सल्ला राधाकृष्ण विखे यांनी दिला़ मुख्यमंत्र्यांना टोला लगावताना ते म्हणाले, ते जिल्हानिहाय आढावा बैठका घेत फिरत आहेत़ अधिकाऱ्यांच्या आकडेवारीवर निष्कर्ष काढत सुटले आहेत़ थोडे खेड्यात फिरुन दुष्काळ पहा म्हणजे समजेल़

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणState Governmentराज्य सरकारRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील