मुंबई : कलेला राजाश्रय असलाच पाहिजे, पण सांस्कृतिक खात्यातली राजाश्रयाची जाहिरातबाजी बंद करण्याचे काम मी नक्की करेन. यशवंतराव चव्हाण यांच्या काळात जे पोलिटिकल कल्चर होते, ते आजच्या काळात आणले पाहिजे. त्यामुळे यापुढे कुठलाही शासकीय पुरस्कार मंत्र्यांच्या हस्ते दिला जाणार नाही, अशी भूमिका सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी मांडली. १३ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या सभागृहात या महोत्सवाला आज प्रारंभ झाला. या वेळी विनोद तावडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अशा कार्यक्रमांना टीव्हीवरचे सूत्रसंचालक असतात, त्यांच्याऐवजी ज्या गावात तो कार्यक्रम आहे तिथल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सूत्रसंचालनाची संधी देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. या वेळी सुधीर नांदगावकर, किरण शांताराम, विजय पाटकर आदी उपस्थित होते.
शासकीय पुरस्कार मंत्र्यांच्या हस्ते नाही
By admin | Updated: January 2, 2015 01:42 IST