शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

महिलांच्या प्रश्नांबाबत सरकार उदासीन

By admin | Updated: June 27, 2017 03:47 IST

आज सर्वच क्षेत्रात महिला पुढे असून, स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना ५० टक्के आरक्षण आहे. मात्र, पुरोगामी महाराष्ट्र म्हणून

मनोहर कुंभेजकर । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आज सर्वच क्षेत्रात महिला पुढे असून, स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना ५० टक्के आरक्षण आहे. मात्र, पुरोगामी महाराष्ट्र म्हणून टेंभा मिरविणारे राज्य सरकार महिलांच्या प्रश्नांबाबत उदासीन आहे, अशी खंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी ‘लोकमत व्यासपीठ’मध्ये बोलताना व्यक्त केली. सॅनिटरी नॅपकिन्स, महिलांसाठी स्वच्छतागृहे याबाबत असलेली मनसेची भूमिका आणि सरकारी उदासीनता यावर शालिनी यांनी भाष्य केले.राष्ट्रीय महिला आयोगाच्या २०१४ च्या निर्देशाप्रमाणे सर्व माध्यमिक शाळा, महाविद्यालये, तंत्रशिक्षण संस्था, सार्वजनिक ठिकाणे, महिला स्वच्छतागृहे आदी ठिकाणी महिलांसह मुलींसाठी मोफत सॅनिटरी नॅपकिन्स मशिन्स बसविण्यात याव्यात, असे निर्देश देण्यात आले होते. आजघडीला सॅनिटरी नॅपकिन्स जीएसटीतून वगळा, या मागणीसाठी आता विविध राजकीय पक्ष आणि महिला संघटना पुढे आल्या आहेत, ही बाब उत्तम असली, तरी मनसेने २०१५ पासूनच माध्यमिक शाळा, महाविद्यालय येथे सॅनिटरी नॅपकिन्स मशिन बसविण्याबाबत राज्य सरकारकडे सातत्याने आवाज उठविला होता. या संदर्भात पालिका आयुक्त अजय मेहता, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख, महिला बालकल्याण व आरोग्य सचिव, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचीही भेट घेतली. मात्र, राज्य सरकारच्या वतीने धोरणात्मक निर्णय असल्यामुळे याबाबत मुख्यमंत्रीच निर्णय घेतील, असे सांगून आरोग्यमंत्र्यांनी चेंडू त्यांच्या कोर्टात टाकला.महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीच्या तुलनेत पिछाडीवर असलेल्या बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशसारख्या राज्यांनी स्वत: पुढाकार घेऊन, मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप सुरू तर केले होतेच, पण त्याचबरोबर त्यांनी शाळा आणि महाविद्यालयांतसुद्धा सॅनिटरी नॅपकिन्स वेंडिंग मशिन्स बसविण्यासाठी पुढाकार घेतला. मात्र, अजूनही राज्य सरकारकडून याबाबत ठोस पावले उचलली जात नाहीत. मनसेने याबाबत २०१५ मध्ये स्वत: पुढाकार घेत आणि कृती करून पश्चिम उपनगरात शाळा, महाविद्यालये येथे सुमारे २० सॅनिटरी नॅपकिन्स वेंडिंग मशिन्स मोफत बसवून दिल्या.१ जुलैपासून जीएसटी लागू होणार आहे. सिंधूर, कंडोमसारख्या गोष्टींना जीएसटीमधून वगळण्यात आलेले आहे. मात्र, सॅनिटरी नॅपकिन्सला यामधून वगळण्यात आलेले नाही. त्यामुळेच याबाबतीत गेल्या ४ जून रोजी दिल्लीत आपण मनसेच्या महिला शिष्टमंडळासोबत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेत, ‘बायो-डेग्रिडेबल’ सॅनिटरी नॅपकिन्स जीएसटीमधून वगळून, जे सॅनिटरी नॅपकिन्स उत्पादक आहे, त्यांच्या किमतीवर जीवनावश्यक वस्तू म्हणून याचा समावेश करून, त्यांच्या किमतीवर बंधन आणावे, अशी आग्रही मागणी केली आहे. शिवाय जे ग्लोबल सॅनिटरी नॅपकिन्स उत्पादक आहेत, त्यांनी माध्यमिक शाळा आणि महाविद्यालये दत्तक घेत, त्यामध्ये सीएसआर फंडातून सॅनिटरी नॅपकिन्स वेंडिंग मशिन्स बसवाव्यात, असेही सुचविले. आज देशात १२ टक्के महिला फक्त सॅनिटरी नॅपकिन्सचा वापार करत असून, ग्रामीण भागात हे प्रमाण फक्त ५ टक्के आहे. एका पाहणीनुसार, मासिकपाळी सुरू झाल्यावर विद्यार्थिनींचे शाळेतील गळतीचे प्रमाण २८ टक्के आहे. सॅनिटरी नॅपकिन्स अभावी महिलांना विविध आजारांना आणि गर्भाशयाच्या कर्करोगाला सामोरे जावे लागते. एकीकडे स्वच्छ भारत अभियान सुरू असताना, महिलांच्या आरोग्याविषयी केंद्र सरकार उदासीन असून, याकडे लक्ष दिले पाहिजे, अशी भूमिका आपण जेटली यांच्याकडे मांडली आहे. जीएसटीमधून सॅनिटरी नॅपकिन्स वगळल्यास केंद्र सरकारवर आर्थिक बोजा पडेल, असे सूतोवाच अर्थमंत्र्यांनी केले आहे, असेही त्यांनी सांगितले. मनसेने २०१४ साली ‘स्वच्छतागृह माझा अधिकार’ चळवळ सुरू केली. आज मुंबईची लोकसंख्या सुमारे १ कोटी ६० लाख इतकी असून, ६० टक्के नागरिक हे झोपडपट्टीत राहतात. एका सर्वेक्षणानुसार मुंबईला सुमारे १ लाख स्वच्छतागृहांची गरज असून, महिलांसाठी हे प्रमाण सुमारे ४ टक्के इतके अत्यल्प आहे. महिलांसाठी स्वच्छतागृहे उभारण्याच्या मागणीसाठी, मनसेच्या नेतृत्वाखाली सुमारे ५० हजार महिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना पोस्टकार्ड पाठवून महिलांची व्यथा मांडली होती, परंतु या पत्रांची दखल घेण्याचे सौजन्यही मुख्यमंत्र्यांनी दाखविले नाही, पण यावरच मनसे थांबली नाही, तर अंधेरी ते दहिसर येथे ज्या ठिकाणी स्वच्छतागृह नाही, अशा ठिकाणी सुमारे ६० सुसज्ज स्वच्छतागृहे बांधून दिली.