शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

'रायगड किल्ल्याचे गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2019 04:13 IST

तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न, आषाढी-कार्तिकी वारीप्रमाणे दरवर्षी रायगडवारीचाही संकल्प

बिरवाडी : रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून किल्ले रायगडचे गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी केंद्र व राज्यातील सरकार कटिबद्ध आहे. रायगडासह राज्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे आश्वासन किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी जमलेल्या हजारो शिवभक्तांना रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले.तिथीनुसार किल्ले रायगडावर ३४६ वा शिवराज्याभिषेक सोहळा वरुणराजाच्या हजेरीत दाट धुक्याच्या साक्षीने मोठ्या उत्साहात साजरा झाला. या वेळी हजारोंच्या संख्येने उपस्थित शिवभक्तांनी छत्रपती शिवरायांचा जयघोष करीत मोठ्या जल्लोषात हा सोहळा साजरा केला. शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीतर्फे तिथीनुसार गेल्या दोन दशकांपेक्षा जास्त काळापासून शिवराज्याभिषेकाचे आयोजन केले जाते.रायगड किल्ल्यासह राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांची पाचाड येथील समाधी व राजवाडा परिसरातील अत्यावश्यक सुविधांची लवकरात लवकर पूर्तता व्हावी, यासाठी प्रयत्नशील आहोत. किल्ले रायगडच्या पुनर्निर्मिती करिता निधीची कोणत्याही प्रकारे कमतरता राहणार नाही याकडेही जातीने लक्ष देणार असल्याचेही रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले. या वेळी सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आ. मनोहर भोईर, राजिप सदस्य मनोज काळीजकर, संजय कचरे, खेडेकर, महाड पंचायत समिती सभापती दत्ताराम फळसकर, माजी सभापती दीप्ती फळसकर आदींनी किल्ले रायगडावरील मेघडंबरीतील छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.आमदार भरत गोगावले यांनी रायगड प्राधिकरण व रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुरू असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करून शिवभक्तांची गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सांगून आषाढी-कार्तिकी वारीप्रमाणे दरवर्षी रायगडवारीचाही संकल्प असल्याचे सांगितले.शिवभक्तांचा जल्लोषशिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, कोकण कडा मित्रमंडळ आणि रायगड जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने तिथीनुसार साजरा होणाऱ्या शिवराज्याभिषेक दिनी इतिहासतज्ज्ञ आप्पा परब यांच्या हस्ते पवित्र नद्यांचे पाणी व दुग्धाभिषेक करण्यात आला. ढोलताशाच्या गजरात तलवारी, भाले नाचवीत शिवभक्तांनी जल्लोष केला.

टॅग्स :RaigadरायगडShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज