शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

सरकार म्हणजे बश्या बैल, त्यांना रुमण्याचा हिसका दाखवा : अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 03:10 IST

शेतक-यांशी आणि शेतीशी भाजपा सरकारचा काहीच संबंध नाही. हे सरकार म्हणजे बश्या बैल आहे, त्यांना वठणीवर आणण्यासाठी एकदा तरी रु मण्याचा हिसका दाखवावाच लागेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित यांनी उमरी येथे रविवारी जाहीर सभेत केले.

नांदेड : शेतक-यांशी आणि शेतीशी भाजपा सरकारचा काहीच संबंध नाही. हे सरकार म्हणजे बश्या बैल आहे, त्यांना वठणीवर आणण्यासाठी एकदा तरी रु मण्याचा हिसका दाखवावाच लागेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित यांनी उमरी येथे रविवारी जाहीर सभेत केले.पवार म्हणाले, सरकारमधील लोकांना गाय, बैल, रेडकू यातला फरक कळत नाही. यांना शेतीतले काहीच समजत नाही तेव्हा या सरकारला वठणीवर आणण्यासाठी एकदा तरी रु मण्याचा (चाबूक) हिसका दाखवाच. आगीतून फुफाट्यात पडल्यासारखी अवस्था आज नारायण राणेंची झाली आहे़ कारण भाजपाने त्यांना गाजर दाखविले आहे़ त्यामुळे भाजपाचे निवडणूक चिन्ह बदलून गाजर केले पाहिजे. राणे आता हताश झाले आहेत़ त्यांनी आता माझ्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, मला मंत्री करा अशी धमकी मुख्यमंत्र्यांना दिली़ राणे म्हणतात, मी मुख्यमंत्री होतो़ आता मला किमान मंत्री तरी करा़ मुख्यमंत्रीपदी राहिलेल्याने कसे रुबाबदार राहावे़ परंतु मंत्रिमंडळातील प्रवेश लांबत चालल्याने राणे आता हताश झाले आहेत़ आजी मुख्यमंत्र्यांनी माजी मुख्यमंत्र्यांची अशी केविलवाणी अवस्था केल्याचा टोलाही पवार यांनी लगावला़ हल्लाबोल यात्रेतील सभेला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री कमलिकशोर कदम आदी उपस्थित होते.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार