शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: DC ची अडचण वाढली, रिषभ पंतवर एका सामन्याची बंदी अन् ३० लाखांचा दंड
2
"सत्तेचा गैरवापर करणे ही पंतप्रधान मोदींची खासियत"; शरद पवार यांचा शिरूरमधून हल्लाबोल
3
प्रचाराच्या अखेरच्या दिवशी शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने; छत्रपती संभाजीनगरात राडा
4
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
5
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
6
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
7
POK मध्ये युद्धजन्य परिस्थिती; पाकिस्तानच्या दादागिरीविरोधात काश्मिरी जनता रस्त्यावर
8
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
9
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
10
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती
11
Fact Check : "मी तुम्हाला बेरोजगार करेन..."; योगी आदित्यनाथ यांच्या Video मागचं जाणून घ्या, 'सत्य'
12
Paytm चे 'अच्छे दिन' परतले; २ दिवसांत १३%ची वाढ, काय म्हणतायत एक्सपर्ट, किती आहे टार्गेट प्राईज?
13
मसाल्यांमधील ETO केमिकल्सवर सरकार अंकुश लावण्याच्या तयारीत, निर्यातदारांना करावं लागणार 'हे' काम
14
रवींद्र धंगेकरांचा भाजपावर गंभीर आरोप, म्हणाले, ‘पुण्यात पैशांचे ट्रक आलेत, आज फडणवीस वाटप करतील’
15
प्रज्वल रेवण्णा प्रकरण उघडकीस आणणारा भाजपा नेता अडचणीत, पोलिसांनी केली अटक, समोर आलं असं कारण   
16
'दिल्लीत बोलवून फाईल दाखवली अन्...'; भाजप प्रचाराचे कारण सांगत काँग्रेसची राज ठाकरेंवर टीका
17
पुण्यातील सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; "ते महाराष्ट्रद्रोही...."
18
"राहुल गांधी हे 'रणछोड दास'; जे स्वत: निवडणूक जिंकू शकत नाही, ते आपल्या पक्षाला..."
19
खळबळजनक ! नोटांनी भरलेला 'छोटा हाथी' वाहन पलटी; रस्त्यावर पडले तब्बल ७ कोटी
20
Mumbai Pali Hill Fire: मुंबईच्या पाली हिलमध्ये अग्नितांडव, थरकाप उडवणारा स्फोट; व्हिडिओ व्हायरल!

कोरोनामुळे घरात बसून कंटाळलेल्या तरुणाई व पर्यटकांना 'एमटीडीसी'कडून 'ही' भन्नाट ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 1:23 PM

एमटीडीसीकडून ' वर्क विथ नेचर' ची सुविधा; फिजिकल डिस्टंसिंगचे नियम पाळून पर्यटनाची संधी 

ठळक मुद्देफिजिकल डिस्टंसिंगचे नियम पाळून पर्यटनाची संधी सध्या पानशेत, कार्ला, माथेरान माळशिरस घाट येथील रिसॉर्ट सुरू

पुणे : लॉकडाऊनमुळे पर्यटनस्थळांवरील अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली आहे. त्यामुळे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने या कोरोनाच्या व कोरोनानंतरच्या काळात तातडीच्या व दीर्घकालीन उपायोजना हाती घेतल्या आहेत. “स्वच्छता हीच सेवा” हे ब्रीद उराशी बाळगून महामंडळाचे कर्मचारी  काम करुन एमटीडीसी केंद्राचा परिसर, खोल्या सुसज्ज आणि स्वच्छ ठेवत आहेत. उपहारगृह आणि अनुषंगिक बाबींची काटेकारेपणे स्वच्छता आणि नियमिपणे निर्जंतुकिकरण केले जात आहे.

लॉकडाऊनमुळे पर्यटनस्थळांवरील अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली आहे. त्यामुळे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने या कोरोनाच्या व कोरोनानंतरच्या काळात तातडीच्या व दीर्घकालीन उपायोजना हाती घेतल्या आहेत. “स्वच्छता हीच सेवा” हे ब्रीद उराशी बाळगून महामंडळाचे कर्मचारी  काम करुन एमटीडीसी केंद्राचा परिसर, खोल्या सुसज्ज आणि स्वच्छ ठेवत आहेत. उपहारगृह आणि अनुषंगिक बाबींची काटेकारेपणे स्वच्छता आणि

नियमिपणे निर्जंतुकिकरण केले जात आहे.

कोरोनामुळे घरात बसून कंटाळलेल्या तरुणाईला व पर्यटकांना एमटीडीसीकडून 'वर्क विथ नेचर ' ची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात मोकळा श्वास घेत कामाचा व पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे. पुण्यातील पानशेत, कार्ला, माथेरान, आणि माळशेज घाटातील एमटीडीसीच्या केंद्रांवर या सुविधेचा लाभ घेता येईल.

     पर्यटन केंद्रावर येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांच्या शरिराचे तापमान  मोजणारी यंत्रणा, सॅनिटाईज करणारे स्प्रे, ऑक्सीमिटर अशी व्यवस्थाही करण्यात आली आहे. तसेच येणाऱ्या पर्यटकांना तातडीच्या वैद्यकिय कारणांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असुन एमटीडीसीच्या सर्व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी आली आहे. शासनाच्या आदेशानुसार पुन्हा एमटीडीसीचे रिसॉर्ट खुले करण्यात आले आहेत.     

कोरोनामुळे सर्वच घरी बंदिस्त  असलेल्या वातावरणात शारीरिक व मानसिक दृष्ट्या त्रासले आहेत. अनेकांना घराबाहेर निसर्गाच्या सानिध्यात मोकळेपणाने श्वास घेण्याची इच्छा आहे. त्यामुळे एमटीडीसीने ' वर्क फ्रॉम होम ' ऐवजी ' वर्क विथ नेचर ' अशी सुविधा उपलब्ध करून दिली आहे.ऑनलाईन पद्धतीने काम करण्यासाठी वाय फाय व इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. एमटीडीसीच्या केंद्रावर येणाऱ्या पर्यटकांसमोर त्यांना दिली जाणारी खोली निर्जंतुक केली जाते. त्यानंतरच पर्यटकांना खोलीत प्रवेश दिला जाते.-------------------सध्या पानशेत, कार्ला, माथेरान माळशिरस घाट येथील रिसॉर्ट सुरू करण्यात आले आहेत. सुमारे ३५ ते ४० टक्के पर्यटक एमटीडीसीच्या केंद्रावर पर्यटनासाठी येत आहेत. महाबळेश्वर व भीमाशंकर येथील रिसॉर्ट शासनाने अधिग्रहीत केले आहेत. परंतु, टप्प्याटप्प्याने एमटीडीसीचे सर्व रिसॉर्ट सुरू करण्यात येणार आहे. ' वर्क विथ नेचर '  साठी पर्यटकांना वायफाय व इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.- दिपक हरणे,प्रादेशिक व्यवस्थापक,महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पुणे.

टॅग्स :Puneपुणेtourismपर्यटनjobनोकरीcorona virusकोरोना वायरस बातम्याState Governmentराज्य सरकार