शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
3
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
4
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
5
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
6
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
7
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
8
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
10
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
11
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
12
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
13
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
14
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
15
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
16
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
17
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
18
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
19
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
20
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)

गुड न्यूज : एसटी जोमाने धावायला लागली हो! ८९ टक्के कर्मचारी रुजू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 13:05 IST

एसटी कर्मचाऱ्यांनी विलिनीकरणाच्या मागणीसाठी नोव्हेंबर महिन्यापासून संप पुकारल्याने राज्याची जीवनवाहिनी ठप्प झाली होती. ग्रामीण भागातील नागरिक आणि विद्यार्थ्यांना त्याचा मोठा फटका सहन करावा लागत होता.

मुंबई :  गेल्या साडेपाच महिन्यांपासून थांबलेली लालपरीची चाके गतिमान होऊ लागली आहेत. आतापर्यंत ८९ टक्के एसटी कर्मचारी सेवेत रुजू झाले असून, बुधवारी ४ हजार ८८८ कर्मचारी कामावर परतले. दिवसभरात ७३ हजार ९७० कर्मचाऱ्यांनी गावोगावी सेवा दिली.एसटी कर्मचाऱ्यांनी विलिनीकरणाच्या मागणीसाठी नोव्हेंबर महिन्यापासून संप पुकारल्याने राज्याची जीवनवाहिनी ठप्प झाली होती. ग्रामीण भागातील नागरिक आणि विद्यार्थ्यांना त्याचा मोठा फटका सहन करावा लागत होता. आता एसटी पुन्हा सुरू झाल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाने संपकऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत कामावर हजर होण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखत ७३ हजार ९७० कर्मचारी सेवेत रुजू झाले असून, उद्यापर्यंत उर्वरित कर्मचारी हजर होतील, असे सांगण्यात आले.

नुकसानीचा अभ्यास करणार - परबआतापर्यंत एसटीचे किती नुकसान झाले, याचा अभ्यास करून नवीन धोरणे आखली जातील. मनुष्यबळाचे नियोजन आणि गुड्स ट्रान्सपोर्ट, डिझेल पेट्रोलपंप यासंदर्भातील प्रलंबित कामे येत्या काळात पूर्ण केली जातील, अशी माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. एसटी कर्मचारी भावूक आहेत. त्यांना खोटी स्वप्ने दाखवून काही लोकांनी पैसै कमावले, वेगळ्या दिशेला जाण्यास भाग पाडले. त्यामुळे त्यांचे प्रचंड नुकसान झाले, अशी टीकाही त्यांनी केली.

२० एप्रिलचा एसटीचा हजेरीपट विभाग    एकूण कर्मचारी    हजर     परतलेले प्रशासकीय    १२००६     ११७९७     २०९ कार्यशाळा    १५७९१     १४३३२     १४५९ चालक    २९४८५     २६३७३     ३११२ वाहक    २४८२६    २१४६८     ३३५८ एकूण    ८२१०८     ७३९७०     ८१३८  

टॅग्स :ST Strikeएसटी संपBus Driverबसचालक