शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Good News; लठ्ठपणा कमी करण्यासाठीची महागडी शस्त्रक्रिया आता सोलापूरात होणार मोफत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 10:51 IST

शासकीय रूग्णालयाने घेतला पुढाकार; सोलापूरकरांचे चार ते आठ लाख रुपये वाचणार

ठळक मुद्देआर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाºया रुग्णांसाठी मोठी शस्त्रक्रिया करणे अवघड असतेछत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात सर्व प्रकारच्या सेवा देण्याचा आमचा प्रयत्नएका महिन्याच्या आतच लठ्ठपणा कमी करण्याची शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात

शीतलकुमार कांबळे 

सोलापूर : लठ्ठपणा हा आजार फक्त श्रीमंतांना होतो असा समज आता खोटा ठरत आहे. हा आजार भारतात मोठ्या वेगाने पसरत असून गरिबांनादेखील होत आहे. या आजारावरील शस्त्रक्रि या फक्त श्रीमंतांच्या आवाक्यात आहे. आता सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात ही शस्त्रक्रियामोफत करण्यात येणार आहे. जिल्ह्यात पहिल्यांदा अशाप्रकारची शस्त्रक्रिया होत आहे. यासाठी डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी पुढाकार घेतला आहे.

सोलापूर शहर हे मेडिकल हब असताना येथील खासगी रुग्णालयात देखील लठ्ठपणा कमी करण्याची शस्त्रक्रिया होत नाही. शहर व जिल्ह्यातील रुग्ण ही शस्त्रक्रिया करण्यासाठी पुणे, मुंबईसह इतर मोठ्या शहरांकडे धाव घेत असतात. अशी शस्त्रक्रिया सोलापुरातील खासगी रुग्णालयातही होत नसताना शासकीय रुग्णालयात होणार आहे. लठ्ठपणा कमी करण्यासाठीची शस्त्रक्रिया करण्यासाठी चार ते आठ लाख रुपये इतका खर्च येतो. या प्रकारची शस्त्रक्रिया करणे ही बहुतांश सोलापूरकरांच्या आवाक्यात नाही. तसेच इतर शहरात जाऊन शस्त्रक्रि या करवून घेणे त्रासदायक ठरते. अशा परिस्थितीत सर्वोपचार रुग्णालयात ही शस्त्रक्रिया मोफत होणार असल्याने सोलापूरकरांचे चार ते आठ लाख रुपये वाचणार आहेत. विशेष म्हणजे ही शस्त्रक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर हे स्वत: करणार आहेत.

‘बेरियाट्रिक’ सर्जरी म्हणजे काय?- लठ्ठपणा कमी करण्यासाठी लॅप्रोस्कोपिक (दुर्बिणीने) सर्जरी बेरियाट्रिक सर्जरी करण्यात येते. या शस्त्रक्रियेमध्ये जठराचा आकार कमी करण्यात येतो. यामुळे गरजेपुरते खाल्ले तरी पोट भरल्यासारखे वाटते. जेवण गरजेपुरते केल्यामुळे लठ्ठपणा कमी होतो. तर दुसºया एका शस्त्रक्रियेच्या प्रकारामध्ये पोट तसेच इतर ठिकाणी वाढलेली चरबी कमी करण्यात येते. सोलापुरात एका खासगी रुग्णालयात फार पूर्वी ‘लायपोसक्शन’ ही लठ्ठपणा कमी करण्यासाठीची शस्त्रक्रिया केली जात होती. सध्या ही शस्त्रक्रिया देखील सोलापुरात होत नाही.

आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाºया रुग्णांसाठी मोठी शस्त्रक्रिया करणे अवघड असते. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात सर्व प्रकारच्या सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. लठ्ठपणाची शस्त्रक्रिया हा त्याचाच एक भाग आहे. सध्या रुग्णालयातील आॅपरेशन थिएटर आणखी अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. एका महिन्याच्या आतच लठ्ठपणा कमी करण्याची शस्त्रक्रिया करण्यास आम्ही सुरुवात करणार आहोत. - डॉ. संजीव ठाकूरअधिष्ठाता, डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

टॅग्स :Solapurसोलापूरgovernment schemeसरकारी योजनाhospitalहॉस्पिटलMedicalवैद्यकीय