शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांचे सुदृढ आरोग्य हा देखील विकासाचा भागच - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2020 20:06 IST

आरोग्याला सर्वात जास्त प्राधान्य देणार असून सुदृढ आरोग्य हादेखील विकासाचा एक भागच आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन कोरोना रुग्णालयांच्या ई लोकार्पण सोहळ्या प्रसंगी केले. 

मीरा रोड - यापुढे संसर्गजन्य रोगांचा सामना करण्यासाठी राज्यात कायमस्वरूपी उपचार केंद्र उभारली जातील. मीरा-भाईंदर महापालिकेने रुग्णालयासाठी जागा द्यावी शासन ते बांधेल. यापुढे आरोग्याला सर्वात जास्त प्राधान्य देणार असून सुदृढ आरोग्य हादेखील विकासाचा एक भागच आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन कोरोना रुग्णालयांच्या ई लोकार्पण सोहळ्या प्रसंगी केले. 

राज्य शासनाने म्हाडाच्या माध्यमातून मीरा भाईंदर महापालिकेतील नागरिकांच्या उपचारासाठी महाजन सभागृहात 206 खाटांचे तर ठाकरे सभागृहात 165 खाटांचे दोन कोरोना रुग्णालय उभारून दिली आहेत. या दोन्ही रुग्णालयांचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांनी केले. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, गीता जैन, महापौर ज्योत्स्ना हसनाळे, आयुक्त डॉ. विजय राठोड आदी उपस्थित होते. सरनाईक यांनी निधी व रेमिडिसीवीर आदी औषधे देण्याची तर महापौरांनी निधी देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली.  मुख्यमंत्री म्हणाले की, सरकार तुमच्या पाठीशी ठाम उभे आहे. तुम्हाला निधी कमी पडू देणार नाही. जे जे लागेल ते सरकार तुम्हाला देईल. आज सरकार ठाम उभे आहे म्हणून कोरोनाचा सामना आपण करतोय. पण प्रत्यक्ष लढाई स्थानिक यंत्रणेने करायची असते. अपेक्षा सर्वांच्याच आहेत. पण सरकार निराश करणार नाही. महापालिकेचा मायबाप राज्य सरकार असतो तर राज्य सरकारचा केंद्र सरकार. सुरुवातीच्या काळात व्हेंटिलेटर, पीपीई किट, एन 95 मास्क मिळत नव्हते. पैशांची तर बोंब आहेच. तुम्ही निधीसाठी मला पत्र देता आणि मी केंद्राकडे पत्र देतो. परिस्थिती बिकट आहे पण ती वस्तुस्थिती आहे. रेमिडीसीवरचा पुरवठा सुरळीत असून त्याची किंमत देखील राज्य सरकारने कमी केली आहे. टॉसिझूलीमॅबची किंमत आटोक्यात आणून पुरवठा वाढवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. परंतु रेमिडिसीवीर, टॉसिझूलीमॅब, फेबिपिरावीर ही औषधे काही उपचार नाही, असे अनेक डॉक्टरांशी चर्चा केल्यावर आढळून आले. या औषधांचा अनावश्यक उपयोग जीवावर बेतू शकतो. त्यामुळे या औषधांचा अतिरेक होता कामा नये, असे मुख्यमंत्री म्हणाले.  कोविडच्या रुग्णास ऑक्सिजन कमी पडू देता कामा नये. राज्यात चाचणी वाढवली म्हणून रुग्ण संख्या वाढली आहे. म्हणून घाबरू नका. आपल्याला मृत्युदर कमी ठेवायचा आहे व त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत . त्यासाठी ऑक्सिजनची गरज जास्त आहे . या संकटाच्या सुरुवातीला मुकाबला करण्यासाठी कोणीच सज्ज नव्हता. कोरोना वर लस 15 ऑगस्टला येणार असे म्हणतात.  लस लवकरात लवकर येवो अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे