शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

वारकऱ्यांना चांगल्या सुविधा

By admin | Updated: July 28, 2016 04:33 IST

पंढरपूर येथील प्रत्येक यात्रेवेळी वारकऱ्यांना चांगल्या सुविधा देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असून सरकारच्या प्रयत्नात काही त्रुटी असतील तर त्याअनुषंगाने लवकरच एक आढावा बैठक घेऊन

मुंबई : पंढरपूर येथील प्रत्येक यात्रेवेळी वारकऱ्यांना चांगल्या सुविधा देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असून सरकारच्या प्रयत्नात काही त्रुटी असतील तर त्याअनुषंगाने लवकरच एक आढावा बैठक घेऊन आवश्यक ते निर्णय घेण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत एका लक्षवेधीला उत्तर देताना सांगितले. आळंदी ते पंढरपूर या दिंडी मार्गावर जागा आरक्षित करुन त्यावर वारकऱ्यांकरीता हॉल बांधून त्या ठिकाणी राहण्याची सोयही करुन दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. बाळासाहेब मुरकुटे यांच्या लक्षवेधीवर बरीच चर्चा सभागृहात झाली. आळंदीपेक्षा पाच पट मोठे क्षेत्र पंढरपूर येथे असतानाही त्याच्या विकासासाठी निधी कमी प्रमाणात दिला जातो, असा आक्षेप भारत भालके यांनी नोंदविला. पंढरपुरातील रस्ते, गटारी यात्रेवेळी कमी पडतात, त्यांच्यावर ताण पडतो. त्यामुळे चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न सरकारने केला पाहिजे अशी अपेक्षा भालके यांच्यासह गणपतराव देशमुख यांनी व्यक्त केली. पंढरपूरसाठी प्राधिकरण नेमण्याची घोषणा झाली,पण नेमक्या किती काळात त्याची कार्यवाही पूर्ण होणार अशी विचारणा देशमुख यांनी केली. निवारा व्यवस्था, पार्कींगची सोय उपलब्ध करुन देण्याची मागणी मुरकुटे यांनी सभागृहात केली. तर भालके यांनी चंद्रभागा नदीच्या प्रदुषणाचा मुद्दा चर्चेत आणला. प्रणिती शिंदे यांनी पंढरपूरसह राज्यातील सर्वच मोठ्या देवस्थान परिसरात आपत्ती व्यवस्थापनची सुविधा मजबुत करण्यात यावी अशी मागणी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी जेथे मोठ्या यात्रा भरतात तेथील आपत्ती व्यवस्थापनाचे आॅडिट करण्याच्या सूचना दिल्या जातील असे सांगितले. (प्रतिनिधी)