शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया:देवीदर्शनासाठी गेलेल्या तरूणाचा खून, तिघे मित्र कोण: रेल्वेस्थानकावर मृतक का थांबला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2017 19:39 IST

दुर्गोत्सवात डोंगरगड येथील बम्लेश्वरी देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या २३ वर्षाच्या तरूणाचा खून करण्यात आला.

गोंदिया: दुर्गोत्सवात डोंगरगड येथील बम्लेश्वरी देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या २३ वर्षाच्या तरूणाचा खून करण्यात आला. त्याचा खून करणारे कोण या दिशेने रेल्वे पोलिसांनी तपास करणे गरजेचे आहे. मात्र, रेल्वे पोलिसांनी या प्रकरणात आकस्मीक मृत्यूची नोंद करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला आहे. 

गोंदिया शहराच्या मनोहर चौक सिव्हील लाईन वॉर्ड क्र. ७ गोंदिया येथील सौरभ हेमराज वाढई (२३) हा आपल्या मित्रांसोबत २६ सप्टेंबरला डोंगरगड येथील बम्लेश्वरी देवीच्या दर्शनासाठी गेला होता. तो मित्रांसोबत २७ सप्टेंबर रोजी गोंदियाच्या रेल्वेस्थानकावर आला. २८ सप्टेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता सौरभचा मृतदेह गोंदिया रेल्वेस्थानकाच्या किमी नं.१०१२/२३ च्या मेन आपलाईन नागपूर अँड कडे मिळाला. शरीरापासून त्याचे मुंडके वेगळे होते. एक हात शरीरापासून वेगळा होता. दुसºया हाताचा चेंदामेंदा झाला होता. तो गोंदियातून मित्रांना घेऊन डोंगरगड येथे गेला होता. तेथून परत आल्यावर तो एकटाच गोंदियाच्या रेल्वेस्थानकावर का थांबला ह्या गोष्टीचा अद्याप उलगडा झाला नाही. त्याने २७ सप्टेंबर रोजी डोंगरगड येथून सकाळी ७.५० वाजता डोंगरगड ते गोंदिया हे परतीच तिकीट घेतले होते. त्या एकाच तिकीटावर चार जणांचा  प्रवास नमूद केलेला होता. सर्व मित्र डोंगरगडवरून परतल्यावर सौरभने घरी न जाता रेल्वेस्थानकावरच मुकाम करण्याची इच्छा जाहीर केल्याची माहिती सुत्रांनूी दिली आहे. तो रेलञवेस्थानकावरच का थांबला. त्याच रात्री त्याचा खून होणे ही बाब विविध शंकाना वाव देत आहे. जे मित्र त्याच्या सोबत देवीदर्शनासाठी गेले होते त्यांनी यासंदर्भात घरच्यांना माहिती दिली का? असे एक ना अनेक प्रश्न या निमीत्ताने पुढे येत आहेत. गोंदिया रेल्वे पोलिसांनी आकस्मीक मृत्यूची नोंद करून नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु मृताच्या आईनेचच पोलीस ठाणे गाठल्यामुळे त्याची ओळख पटली. तपास हवालदार निलेश बारड करीत आहेत.

चार दिवस उलटूनही जबाब नाही-

गोंदिया रेल्वे पोलीस खून प्रकरण दाखल करण्याच्या विचारात दिसत नाही. आपलाच काम वाढेल या भावनेतून रेल्वेने कटून मृत्यू झाल्याचे दर्शवून आकस्मीक मृत्यूची नोंद रेल्वे पोलिसांनी घेतली आहे. परंतु हा अपघात किंवा आत्महत्या नसून खून असल्याचा दाट संशय आहे. या संदर्भात पोलिसांना कुणकुण लागली तरीही पोलिसांनी या संदर्भात कसलीही चौकशी केली नाही. चार दिवस लोटूनही आतापर्यंत मृताच्या घरच्यांचे बयाण सुध्दा झाले नाही.

टॅग्स :MurderखूनCrimeगुन्हा