शहरं
Join us  
Trending Stories
1
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
4
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
5
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
6
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
7
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
8
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
9
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
10
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
11
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
12
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
13
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
14
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
15
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
16
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
17
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
18
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
19
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

गोल्डन मॅन दत्तात्रय फुगेचा दगडाने ठेचून खून

By admin | Updated: July 15, 2016 09:19 IST

सोन्याचा शर्ट शिवल्यामुळे चर्चित आलेल्या गोल्डन मॅन दत्तात्रय फुगे यांचा शुक्रवारी मध्यरात्रि बाराच्या सुमारास दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे.

ऑनलाइन लोकमतपुणे, दि.१५ -  सोन्याचा शर्ट शिवल्यामुळे जगभर गाजलेले पिंपरी-चिंचवडचे गोल्डमॅन दत्ता फुगे यांचे चार ते पाच जणांनी घरातून अपहरण करून दगडाने ठेचून निर्घृण खून केला. दिघी येथील भारतमातानगर भागात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. काही दिवसांपूर्वी झालेल्या आर्थिक वादातून हा खून झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी याप्रकरणी चार-पाच जणांना ताब्यात घेतले असून त्यामध्ये फुगे यांच्या पुतण्याचाही समावेश आहे. 

रात्री नऊच्या सुमारास भोसरी येथील राहत्या घरातून फुगे यांना चार ते पाचजणांनी बळजबरीने नेले होते, अशी माहिती त्यांच्या पत्नी व माजी नगरसेविका सीमा फुगे यांनी पोलिसांना दिली. दिघीच्या भारतमातानगरमध्ये रात्री बाराच्या सुमारास फुगे यांच्यावर कोयत्याने वार करण्यात आले तसेच दगड घालून डोक्याचा चेंदामेंदा करून हल्लेखोर पसार झाले. घटना स्थळावर पोलिसांना कोयता मिळाला आहे. पोलिसानी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व फुगे यांचा मृतदेह वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवला.
फुगे हे खासगी सावकारीचा व्यवसाय करीत असत. भोसरी येथे वक्रतुंड चिटफंड फंडच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणात ठेवी गोळा करून तसेच व्याजाने पैसे देऊन अनेकांची फसवणूक केल्याच्या प्रकरणी त्यांच्यावर काही गुन्हे देखील दाखल आहेत. आठ ते दहा दिवसांपूर्वी हल्लेखोरांबरोबर फुगे यांचे पैशांवरून भांडण झाले होते, अशी माहिती  पोलीस तपासात पुढे आली आहे.
दत्ता फुगे यांच्या पत्नी सीमा फुगे या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माजी नगरसेविका आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर त्या निवडून आल्या होत्या. जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांचे नगरसेवकपद रद्द झाले होते. दत्ता फुगे हे स्वतः शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. 
अंगावर सोन्याचे दागिने घालण्याच्या हौसेमुळे ते पिंपरीचे गोल्डमॅन म्हणून ओळखले जात. सुमारे साडेतीन किलो सोन्याचा शर्ट बनवून त्यांनी विश्वविक्रम नोंदविल्याने ते एकदम प्रसिद्धीझोतात आले होते. सतत कोणत्या ना कोणत्या कारणास्तव वादग्रस्त ठरलेल्या फुगे यांना  काही महिन्यापूर्वी पोलिसांनी तडीपारीची नोटीसही बजावली होती.