शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

दिवाळीत राज्यामध्ये सोने-चांदीची तब्बल दोन हजार कोटींची उलाढाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2020 05:25 IST

Gold Price: मुहूर्त साधण्यासाठी सुवर्णपेढ्यांवर गर्दी; एकट्या जळगावमध्ये ७० कोटींची खरेदी 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई/जळगाव : दिवाळीतील सर्व मुहूर्तावर यंदा मोठ्या प्रमाणात विविध वस्तूंची खरेदी तर झालीच, पण  धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन तसेच पाडवा व भाऊबीज या निमित्ताने सोने-चांदीला मोठी मागणी असल्याचे दिसून आले. यामुळे राज्यात दोन हजार कोटींची, तर जळगावात ७० कोटींची उलाढाल झाल्याचे सांगण्यात येते. देशभरात जळगावातील सोने प्रसिद्ध आहे. त्यामुळे  येथे नेहमीच सोने खरेदीसाठी गर्दी असते. 

नवरात्रीपासून सुवर्ण पेढ्या गजबजून गेल्या.  तेव्हापासून अद्यापही गर्दी कायम आहे. धनत्रयोदशीला सोने खरेदीस वेग आला. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर  मोठी खरेदी झाली.  पुन्हा पाडवा व भाऊबीजेला खरेदीत आणखी भर पडली. लक्ष्मीपूजनापेक्षा पाडव्याला सोने खरेदीला अधिक महत्त्व दिले जाते. त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जेवढी गर्दी झाली, त्यापेक्षा अधिक गर्दी पाडव्याला झाली. 

सोन्याचा भाव गेला ५१ हजारांच्या वरn जळगावातील १५०च्यावर  सुवर्णपेढ्यांमध्ये दिवाळीत ७० कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. धनत्रयोदशीला सोन्याचे भाव  ५१ हजार १०० रुपये प्रति तोळ्यावर होते. हा मुहूर्त झाल्यानंतर सोन्याचे भाव वाढले व लक्ष्मीपूजनाला ते ५१ हजार ५०० तोळ्यावर पोहचले.  

n चांदीचेही भाव धनत्रयोदशीला ६३ हजार ५०० रुपयांवर होते, ते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ६४ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आले. त्यानंतर पाडवा व भाऊबीजेला याच भावावर खरेदी झाली. राज्यात जवळपास दोन हजार कोटी रुपयांची उलाढाल केवळ सोने-चांदीत झाल्याचा अंदाज आहे. 

 

गुंतवणूकदारांची दिवाळी

कोरोनावरील प्रतिबंधक लसीच्या मात्रा ९५ टक्के लोकांवर यशस्वी ठरल्याचे मॉडर्ना या अमेरिकी कंपनीने जाहीर करताच जगभरातील भांडवली बाजारांनी घेतलेल्या उसळीचे प्रतिबिंब मुंबई भांडवली बाजारातही उमटले. दीपावलीच्या सुट्टीनंतर मंगळवारी बाजारातील व्यवहार सुरू होताच निर्देशांकाने मोठी झेप घेत ४४ हजाराचा टप्पा पार केला. ४४,१६१.१६ ही तेजीची उंची गाठल्यानंतर निर्देशांक दुपारी ४३,९५२.७१ अंकांवर स्थिरावला. मंगळवारी एकूण ३१४.७३ अंकांनी निर्देशांक वधारला. 

दीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खरेदीदारांची वाढलेली क्रयशक्ती, देशात घटत असलेली कोरोनारुग्णांची संख्या आणि पूर्वपदावर येत असलेली जागतिक बाजारपेठ अशी सर्व अनुकूल परिस्थिती असताना मॉडर्नाच्या गुडन्यूजमुळे मंगळवारी भांडवली बाजारात चैतन्य संचारले. निर्देशांकाने ४३,६३८ ही आपली आधीची पातळी सोडून ४४,१६१.१६ ही नवी उच्चांकी पातळी गाठली. धातू, औद्योगिक, बँकिंग व वित्त क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांना जादा मागणी आली. टाटा स्टीलचे समभाग सहा टक्क्यांनी वधारले. दिवसअखेरीस निर्देशांक ४३,९५२.७१ अंकांवर स्थिरावला.दरम्यान, निफ्टीनेही १२,९३४ हा नवा उच्चांक गाठला. बाजारातील व्यवहार बंद होतेवेळी १२,८७४.२० अंकांवर निर्देशांक स्थिरावला. निफ्टी निर्देशांकात ९३.९५ अंकांची वाढ नोंदवली गेली.

 

टॅग्स :GoldसोनंSilverचांदी