शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
3
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
4
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
5
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
6
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
7
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
8
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
9
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
10
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
11
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
12
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
13
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

देवानंतर नमवी मस्तक आईच्या पायी

By admin | Updated: May 8, 2016 02:45 IST

आईच्या उपकारांची परतफेड कुणीच करू शकत नाही हे माहीत असूनही, आईविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जगभरात ‘मातृ दिन’ साजरा केला जातो. फूल ना फुलाची

मुंबई : आईच्या उपकारांची परतफेड कुणीच करू शकत नाही हे माहीत असूनही, आईविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जगभरात ‘मातृ दिन’ साजरा केला जातो. फूल ना फुलाची पाकळी म्हणून काही भेटवस्तू देत, आईच्या उपकारांची परतफेड करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न म्हणजे ‘जागतिक मातृ दिन’ होय. याच ‘मातृ दिनी’ विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांच्या आयुष्यातील आईचे स्थान, करिअरच्या प्रवासातील आईचा पाठिंबा याविषयी ‘लोकमत’कडे कृतज्ञ भावना व्यक्त केली आहे, तसेच ‘आई’च्या संस्काराचा वसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवीत असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले आहे.शिस्तप्रिय आईमाझी आई अतिशय शिस्तप्रिय आहे, त्यामुळे शिस्त हा गुण तिने माझ्यातही उतरवला. बाबा लाड करायचे, पण त्यावर लगाम आईचा असायचा. माझी आई अतिशय खंबीर आहे. माझी बीएससीची परीक्षा सुरू असताना माझ्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे अभ्यासात लक्ष नव्हते. एक पेपर चांगला गेला नव्हता. रात्रभर मला झोप लागली नव्हती. आईला माझ्या मनाची घालमेल कळली आणि तिने मला जवळ घेतले आणि सांगितले की, एक पेपर गेला वाईट ठीक आहे, पण पुढचा पेपर चांगला लिही. खरं तरं वडील गेल्यापेक्षा नवरा गेल्याचे दु:ख आमच्यापेक्षा तिला अधिकच होते, पण ते सारे मागे टाकून आम्हा भावंडांना वडिलांची उणीव भासू दिली नाही. - डॉ. कविता रेगे, प्राचार्या, साठ्ये महाविद्यालयसतत तेवणारी ‘समई’आयुष्याच्या प्रत्येक संकटाला सामोरे जाण्याची जिद्द आईने दिली. तेवत राहणाऱ्या समईची उपमा मी आईला देते. शाळेचा एक किस्सा प्रकर्षाने आठवतो. माझी उंची लहान असल्यामुळे बाई मला नेहमी पहिल्या बाकावर बसवत व सारखे प्रश्न विचारत असत. एकदा घरी येऊन मी विचारले, ‘आई, माझ्या उंचीमुळे मला पहिल्या बाकावर बसवतात आणि सारखे प्रश्न विचारतात. माझी उंची लहान का?’ माझ्या या प्रश्नावर आईने उत्तर दिले, ‘अगं, शारीरिक उंचीपेक्षा शिक्षणाची उंची गाठ.’ त्यानुसार, मी शिक्षणासाठी स्वत:ला झोकून दिले. सकाळी उठल्यावर पृथ्वीला नमस्कार करण्याची शिकवण आईने दिली. आईने दिलेले संस्कार मुलांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न नेहमीच करते. - डॉ.स्नेहलता देशमुख, माजी कुलगुरू.संस्कारांचा ‘ठेवा’ हाच खजिनामाझी आई अशिक्षित, पण शिक्षणाची महती ती चांगलीच जाणून होती. म्हणून आम्हा भावंडाना तिने कायम शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. कितीही मोठे झालो, तरी कुटुंबाला विसरू नका, अशी शिकवण आईने दिली. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर काही क्षण आले, ज्याने मी कोलमडून गेले असेन, पण आईने त्या साऱ्या क्षणांवर मात करण्याची ताकद दिली. मी प्राचार्य आहे ते केवळ आईमुळे. मीसुद्धा आई आहे. त्यामुळे आईने दिलेली प्रत्येक शिकवण मुलांनासुद्धा देते. माझ्या मुलांनाही मोठे करण्याची जिद्द मी उरी बाळगली आहे. यासाठी आईचे जितके आभार मानावे, तितके कमीच आहेत - डॉ. टी.पी. घुले, प्राचार्या, एम.डी. महाविद्यालयमाणसे जोडण्याची कला दिलीकोणतेही काम करताना शिस्तपूर्वक, अचूक निर्णय क्षमतेने, अनेक माणसांना जोडत माया लावून करण्याची शिस्त आईने दिली. ‘पैसा- प्रतिष्ठा’ यापेक्षा मानसिक समाधानाला तिने अधिक महत्त्व दिले. काहीही करताना आपल्या घरातल्यांना विश्वासात घ्यायचे, हे बाळकडू तर अगदी लहानपणापासून आईने दिले. या गोष्टींमुळे आयुष्यात खूप आव्हाने स्वीकारायला मिळाली. कामात समाधान मिळवता मिळवता माणसांना जोडण्याची कला जोपासता आली.- प्रा. दीपा ठाणेकर, रामनिरंजन झुनझुनवाला महाविद्यालयतीन पिढ्यांचा वसा माझी आई सविता चितळे हे अगदी वेगळेच व्यक्तिमत्त्व, मातेचे ऋण कधीही फिटत नाहीत, असे म्हणतात ते खरेच आहे. आईतील सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे तिचा आत्मविश्वास आणि प्रचंड जिद्दी स्वभाव,दुसऱ्याला सदैव चांगले द्यावे. हा तिच्यातील वाखाणण्यासारखा गुण. तिने दिलेल्या संस्काराच्या शिबिराची कास धरून आयुष्यात वाटचाल केली. आईने दिलेले हे संस्कारलेणं मी माझ्या लेकीच्या हातात दिले आहे. - सुचेता नलावडे, क.जे. सोमय्या महाविद्यालयआई माझी ‘ग्रेट’माझे अभिनयाचे स्वप्न साकारण्यासाठी माझी आई कायम पाठीशी उभी राहिली. अभिनेत्री व्हायची इच्छा बोलून दाखवल्यावर सगळ््यांनी विरोध केला. पण माझी आई मात्र माझ्या पाठीशी राहिली. एक अट मात्र तिने मला घातली, ती शिक्षण पूर्ण करण्याची. ती अट मी पूर्ण केली. आज अभिनय क्षेत्रात आहे, ते केवळ माझ्या आईमुळे. माझी आई ग्रेट आहे.- लीना भागवत, अभिनेत्री आईच्या प्रोत्साहनामुळे यशाचे शिखर गाठलेलहानपणापासून आईकडून मिळालेले प्रेम आणि सहकार्यामुळे प्रत्येक अडचणींवर मात केली. त्यात वेळोवेळी आजारपणात उपाशीपोटी रात्रंदिवस तिने माझी सेवा केली. त्यामुळे माझ्या आयुष्यात तिचे स्थान फार महत्त्वाचे आहे. तिच्या अंगी असलेला समाजकार्याचा वसा माझ्या कामातून पुढे नेण्याचा मी प्रयत्न करते. मुळात अगदी लाडा कौतुकाने तिने मला मोठे केले. त्यामुळे तिच्या म्हातारपणात मी तिची आई होण्याचा प्रयत्न करते आहे.- रजनी पंडित, पहिली महिला गुप्तहेरआईचे स्वप्न साकारण्यासाठी धडपडआईबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक दिवस असूच शकत नाही. किंबहुना, कृतज्ञतेसाठी वर्ष नव्हे, तर संपूर्ण आयुष्यही अपुरे पडेल. लहानपणी जेव्हा आई विविध गोष्टी सांगायची, शिस्त लावायची, तेव्हा त्या गोष्टी खटकत असत, प्रसंगी राग ही येई, पण त्या शिस्तीमुळे आयुष्यात यशाची वाट चालता येत आहे. आज आई झाल्यावर आईचे महत्त्व कळते. घर सांभाळत सर्वांची काळजी घेताना ती अविरत काम करत असते. कोणतीही तक्रार न करता, हे विशेष. आपल्या मुलांवर योग्य संस्कार करताना त्यांच्या पंखात बळ देण्याचेही काम करावे लागते, याची आज प्रचिती होत आहे. माझी आई एक सामान्य गृहिणी असताना मला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रगती करण्यासाठी ती सतत पाठीशी उभी राहिली. आईच्या स्वप्नांना जेव्हा आपण वास्तवात उतरवू, तेव्हा खऱ्या अर्थाने ‘मातृ दिन’ साजरा होईल, असे मला वाटते. - अंजली भागवत, (नेमबाज) आॅलिम्पिक सुवर्ण पदक विजेती आई म्हणजेच कुटुंब!माझ्यासाठी ‘आई’ म्हणजेच बाबा, भाऊ, बहीण, मैत्रीण आहे. त्यामुळे आमचे नाते खूप पारदर्शी आहे. तिच्याशी बोलताना कोणतेच दडपण न घेता सर्व गोष्टी शेअर करते. बाबा गेल्यानंतरही ती कधीच डगमगली नाही, तर खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी राहून संपूर्ण घर सावरले. यशाच्या शिखरावर पोहोचले, तरी पाय जमिनीवरच ठेवायचे, ही शिकवण तिने दिली. आज अभिनय क्षेत्रात स्ट्रगल सुरू असताना कोणत्याचा आमिषांना न भुलता स्वत:च्या कामावर विश्वास ठेवत, पुढे जाण्यासाठी तिने प्रेरणा दिली. माझ्या आयुष्यातील तिचे स्थान शब्दांत मांडणे कठीण आहे, तरीही या दिनाच्या निमित्ताने तिचे खूप आभार मानावेसे वाटतात. - सखी गोखले, अभिनेत्रीआईची प्रेरणा हाच आत्मविश्वासआजमितीस माझी १०९ पुस्तके प्रकाशित झाली असून, प्रत्येक पुस्तक लिहून झाले की, आईच्या फोटोसमोर ठेवण्याचा दिनक्रम अखंड सुरू आहे. सातवीत असताना लिहिलेल्या निबंधाचे खूप कौतुक झाले होते, त्यावेळी आईने काढलेले कौतुकाचे उद्गार आजही स्मरणात आहेत. ती म्हणाली होती, ‘तुझ्यात सरस्वती आहे, कायम लिहीत राहा.’ आईने लिखाणासाठी दिलेले हे प्रोत्साहनच माझी प्रेरणा ठरली. मार्गदर्शकाप्रमाणे आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आईने पाठिंबा दिल्यामुळे आजवर हे स्थान गाठले आहे. - डॉ. विजया वाड, ज्येष्ठ साहित्यिकानिवडीचे स्वातंत्र्य आईने दिलेतुझ्या आवडीप्रमाणे क्षेत्र निवड, असा मोलाचा सल्ला तिने दिला. त्यानंतर हा प्रवास सुरू झाला आणि आज तिच्यामुळे हे स्थान मिळवू शकले. आईच्या प्रत्येक लहान-लहान गोष्टींचा प्रभाव माझ्यावर आहे. या क्षेत्रात काम करत असताना बरेच चढउतार येतात, त्यावेळी आईची खूप आठवण येते. मात्र, या आठवणीतून सकारात्मक ऊर्जा घेत चढउतारांवर मात करायला तिने शिकविले आहे. आज यशाचे शिखर गाठले असताना, हे सर्व पाहायला ती या जगात नाही. मात्र, प्रत्येक क्षणाला माझी ऊर्जा बनून संकटाला तोंड द्यायला तिने शिकविले आहे. - डॉ. नंदिता पालशेतकर, स्त्रीरोग तज्ज्ञ