शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
2
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
3
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
4
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
5
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
6
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
7
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
8
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
9
मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; 'पंतप्रधान धन-धान्य कृषी योजने'साठी २४ हजार कोटींची तरतूद
10
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
11
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
12
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका
13
“भाजपात संघटन चांगले, शिंदेसेनेत पक्षांतर्गत शिस्त नाही, त्यामुळे...”; हेमंत गोडसे थेट बोलले
14
"मुलींपासून दूर केलं, मला न सांगता..."; गुहेत सापडलेल्या रशियन महिलेच्या पतीने मांडली व्यथा
15
२४० km रेंज अन् स्टायलिश लूक; लॉन्च झाली दमदार EV क्रूझर बाईक, किंमत फक्त सव्वा लाख...
16
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
17
"माझ्याकडून ज्यांना घेतलं त्यांच्यासाठी मुख्यमंत्री..."; दानवेंच्या निरोपसमारंभात उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला
18
आधी प्रायव्हेट जेटवरून चर्चेत, आता आलिशान जीवनशैली समोर! झोमॅटोच्या मालकाची नेटवर्थ किती?
19
MTNL Loan Defaults: कर्जात बुडालीये 'ही' सरकारी कंपनी; बँकांना परत करू शकत नाहीये ८५८५ कोटींचं लोन, जाणून घ्या
20
भारतातून येमेनच्या मौलवींना गेला एक फोन, 'या' व्यक्तीच्या कॉलने वाचला निमिषा प्रियाचा जीव

देवालाही गंडवतात!

By admin | Updated: March 8, 2015 01:57 IST

‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ या चित्रपटात अभिनेता मकरंद अनासपुरे विठ्ठलाला नवस बोलतो...‘मी निवडणूक जिंकलो, आमदार बनलो की, देवा तुला सोन्याची टोपी देईन.’

मंदिर विश्वस्त हैराण : नवस फेडण्यासाठी नकली चांदीच्या वस्तूंचे दान प्रशांत तेलवाडकर - औरंगाबाद‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ या चित्रपटात अभिनेता मकरंद अनासपुरे विठ्ठलाला नवस बोलतो...‘मी निवडणूक जिंकलो, आमदार बनलो की, देवा तुला सोन्याची टोपी देईन.’ निवडून आल्यावर तो मंदिरात जातो आणि सोन्या नावाच्या मुलाच्या डोक्यावरील कापडी टोपी काढून देवाच्या डोक्यावर ठेवतो... हा झाला चित्रपटातील विनोद... पण देवाला अशा ‘टोप्या’ वास्तवातही घातल्या जातात. नकली चांदी अर्पण करून देवालाच फसविणाऱ्या प्रकारांमुळे औरंगाबादेतील काही मंदिरांचे विश्वस्त हैराण झाले आहेत.बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिरात भाविक नवसापोटी चांदीचे बेल, त्रिशूळ आणून देतात. काही महिन्यांपूर्वी या वस्तूंचे परीक्षण करण्यात आले. त्यात सुमारे किलोभर चांदी नकली असल्याचे सोनाराने सांगितले. शहराचे आराध्य दैवत संस्थान गणपती. त्यालाही भाविकांनी सोडलेले नाही. भाविक नवसफेडीसाठी चांदीच्या दुर्वा, मोदक आणून येथे देतात. मंदिराच्या विश्वस्तांनी या चांदीच्या वस्तू गाळून त्याची देवाच्या डोक्यावर छत्री तयार करण्याचा निर्णय घेतला. मात्र, जमा झालेल्या चांदीत नकली चांदीचे प्रमाण अधिक असल्याचे आढळले. असाच अनुभव सिडको एन-१ येथील भक्ती गणेश मंदिर, दिवाण देवडी येथील पावन गणेश मंदिरातील विश्वस्तांना आला. घृष्णेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष संजय वैद्य यांनी सांगितले की, नवस फेडताना लोक मंदिरात चांदीच्या वस्तू आणून देतात. त्याची भाविकांना रीतसर पावती दिली जाते. चांदीच्या वस्तूंचे आॅडिट पंचांसमोर होत असते. तिथे कोणी तज्ज्ञ नसतो. या वस्तूंची नोंद झाल्यानंतर सर्वांच्या त्यावर सह्या होतात. जेव्हा सोनाराला बोलवून चांदीची तपासणी केली जाते, त्यात ६० टक्के वस्तू नकली चांदीच्या असल्याचे आढळून येते. मात्र, पंच यावर विश्वास ठेवत नाहीत. अशा वेळी विश्वस्तांकडे संशयाच्या नजरेने बघितले जाते, अशी व्यथा गणपती ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त प्रफुल्ल मालानी यांनी मांडली.फसवणूक टाळण्यासाठी...ही फसवणूक टाळण्यासाठी व्यापाऱ्यांनी नवसाची चांदी देताना ग्राहकांना नकली व असली चांदीमधील फरक सांगून वस्तू विक्री करावी व ग्राहकांनी चोखंदळपणे चांदीच्या वस्तू खरेदी कराव्यात, असे आवाहन सराफा व्यापारी जुगलकिशोर वर्मा यांनी केले.‘झीरो टन’ चांदी म्हणजे काय? : जर्मन सिल्व्हर या प्रकाराला व्यापारी भाषेत ‘झीरो टन’ चांदी म्हणतात. जर्मन सिल्व्हरच्या वस्तूवर चांदीचा मुुलामा चढवून त्यास पॉलिश दिले जाते. याच वस्तूला झीरो टन (नकली चांदी) म्हणतात. उल्लेखनीय म्हणजे, शुद्ध चांदीपेक्षा नकली चांदी जास्त आकर्षक दिसते. यामुळे लोक फसतात. अस्सल चांदीचा भाव ३७५०० रुपये किलो आहे, तर झीरो टन चांदी १ हजार रुपये किलोने मिळते.