शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

गोव्यात यंदा उपमुख्यमंत्रीपद नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2017 04:47 IST

मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन होणाऱ्या सरकारमध्ये यावेळी उपमुख्यमंत्रीपद नसेल. मगोपचे आमदार सुदिन ढवळीकर यांना सार्वजनिक बांधकाम व वाहतूक

पणजी : मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन होणाऱ्या सरकारमध्ये यावेळी उपमुख्यमंत्रीपद नसेल. मगोपचे आमदार सुदिन ढवळीकर यांना सार्वजनिक बांधकाम व वाहतूक, विजय सरदेसाई यांना नगर विकास, तर रोहन खंवटे यांना महसूल किंवा क्रीडा ही खाती दिली जातील, अशी खात्रीलायक माहिती मिळाली. भाजपचे मायकल लोबो यांना पहिल्या टप्प्यात मंत्रीपद दिले जाणार नाही, हेही सोमवारी स्पष्ट झाले.फ्रान्सिस डिसोझा हे पार्सेकर मंत्रिमंडळात व तत्पूर्वी पर्रीकर मंत्रिमंडळातही उपमुख्यमंत्री होते. मगोपचे आमदार ढवळीकर यांना यावेळी उपमुख्यमंत्रीपद दिले जाईल, अशी चर्चा होती; पण ती चुकीची असल्याचे भाजपच्या एका नेत्याने ‘लोकमत’ला सांगितले. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद असणारच नाही. २०१२ सालीही प्रारंभी पर्रीकर सरकारमध्ये उपमुख्यमंत्री नव्हते. ते नंतर तयार केले गेले.पर्रीकर यांची सोमवारी गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई व भाजपचे कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांच्याशी पुन्हा बैठक झाली. गोवा फॉरवर्डच्या तीनही आमदारांना मंत्रिपद देण्याची प्रारंभी भाजपची तयारी नव्हती; पण लोबो यांनी मध्यस्थी केली. गोवा फॉरवर्डचे विनोद पालयेकर यांना कला व संस्कृती आणि जलस्रोत ही खाती मिळण्याची शक्यता आहे. पर्रीकर यांनी स्वतंत्रपणे खंवटे यांच्याशीही चर्चा केली व त्यांना कोणते खाते अपेक्षित आहे हे जाणून घेतले. महसूल किंवा क्रीडा ही खाती खंवटे यांना मिळू शकतात, असे सूत्रांनी सांगितले. पर्यटन खाते पर्रीकर हे तूर्त स्वत:जवळ ठेवणार आहेत. गोविंद गावडे किंवा जयेश साळगावकर यांना कोणती खाती द्यावी, ते शपथविधी सोहळ्यानंतर पर्रीकर ठरवणार आहेत. भाजपच्या कुठच्या आमदारास मंत्रिपद द्यावे ते ठरलेले नाही. फ्रान्सिस डिसोझा यांच्यासोबत कुंभारजुवेचे आ. पांडुरंग मडकईकर किंवा कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल किंवा साखळीचे आमदार प्रमोद सावंत यांना मंत्रिपद दिले जाऊ शकते. (खास प्रतिनिधी)