रोहिणखेड मशिदीचा गौरव

By Admin | Updated: August 21, 2015 01:37 IST2015-08-21T01:37:59+5:302015-08-21T01:37:59+5:30

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा; ठेवा जपण्याचे केले आवाहन.

The glory of Rohinkhade mosque | रोहिणखेड मशिदीचा गौरव

रोहिणखेड मशिदीचा गौरव

मुरलीधर चव्हाण / मोताळा (जि. बुलडाणा): विरोध-सर्मथनाच्या वादळात अखेर बुधवारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला. उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या या सोहळ्यात पुरस्कारप्राप्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी सत्काराला उत्तर देतांना महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे जपण्याचे आवाहन सरकारला केले. यासाठी त्यांनी उदाहरणादाखल मोताळा तालुक्यातील रोहीणखेडच्या प्रख्यात मशिदीचा उल्लेख केला. महाराष्ट्रभुषण पुरस्काराच्या निमित्ताने रोहिणखेडच्या मशिदीचा गौरव प्रथमच राजभवनात झाला. यासोबतच सिंदखेडराजा येथील लखुजी जाधव यांच्या राजवाड्याचाही उल्लेख केल्यामुळे हा सोहळा जिल्हावासीयांना सुखावणारा ठरला. बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यापासून १२ कि.मी. अंतरावरील ह्यरोहिणखेडह्ण हे प्रसिद्ध तथा पुरातन वस्ती असणारे गाव आहे. येथे स्थापत्य कलेचा विलोभनीय उदाहरण असलेली मशीद आहे. एकेकाळी निजामशाहीत राजधानीचे शहर म्हणून रोहिणखेड गावाला ह्यरोहिणाबादह्ण अशी ओळख होती. या ठिकाणी सन १८८२ मध्ये खुदावतखाँ महमद यांनी बांधलेली पुरातन ह्यमशीदह्ण आहे. या मशीदीच्या भिंतीवर कुराणाच्या ह्यआयतह्ण आरेबिक भाषेत लिहिल्या आहेत. या भिंतीवरील आयतांवरून ओले कापड फिरविल्यास लाल अक्षरातील अक्षरे दिसतात व ओलावा नाहीसा झाला की अक्षरे लुप्त होतात. आजही दर शुक्रवारी विशेष नमाज पठन या ठिकाणी केल्या जाते. या मशीदीचे बांधकाम संपूर्ण दगडामध्ये झाले असून, कला कृतीचा उत्तम नमुना ही मशीद प्रसिद्ध आहे. त्यामुळे या मशीदीला ऐतिहासिक महत्व प्राप्त झालेले आहे. रोहिणखेड गावात या मशीदीसह अनेक ठिकाणी पुरातन वास्तुंचा ठेवा आहे. येथे दोन मोठय़ा लढाया झाल्याचा इतिहास आहे. सन १४३७ च्या सुमारास खान्देशचा सुलतान नजिरखानने त्याचा जावई अल्लाउदद्ीन बहामनीवर स्वारी केली. सन १९५0 च्या सुमारास अहमदनगरच्या राजकुमार बुरहानने खान्देशचा राजा अलिखानच्या बरोबर जमालखानवर याच ठिकाणी युद्ध केल्याची नोंद आहे. निजामशाहीतील रोहिणाबाद हे राजधानीचे शहर व्यापारासाठी प्रसिद्ध असल्याने सुखी व समृद्ध होते.

Web Title: The glory of Rohinkhade mosque